अभिनेता आमिर खानवर कोव्हिड प्रोटोकॉल भंग केल्याचा आरोप, भाजप आमदाराकडून पोलीस तक्रार
भाजपचे लोनी येथील आमदार नंद किशोर गुर्जर यांनी आमिरवर कोव्हिड प्रोटोकॉल भंग केल्याचा आरोप केला आहे.
लखनौ : सुपरस्टार आमिर खान सध्या आपला आगामी चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’चं काम करत आहे. नुकतंच आमिरने उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यात या चित्रपटाचं चित्रीकरण देखील केलं. मात्र, आता भाजपचे लोनी येथील आमदार नंद किशोर गुर्जर यांनी आमिरवर कोव्हिड प्रोटोकॉल भंग केल्याचा आरोप केला आहे. तसेच आमिरविरुद्ध पोलीस तक्रार दिली आहे (Police complaint against Aamir Khan by BJP MLA alleging violation of COVID protocol ).
प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, आमिर खान गाझियाबादमध्ये चित्रीकरणासाठी गेला असता त्या ठिकाणी त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यानंतर आमिरने देखील चित्रीकरणानंतर या ठिकाणी आलेल्या चाहत्यांसोबत सेल्फी फोटो घेतले. मात्र, यावेळी आमिरने आणि त्याच्या चाहत्यांनी मास्क घातल्याचा दावा केला जात आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी न घेतल्याचा आरोप करत भाजप आमदार गुर्जर यांनी थेट पोलीस तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा : मराठी शिकवणारा गुरु हरपला, सुहास लिमयेंच्या निधनाने आमिर खान भावविवश
दरम्यान, आमिर खान पुन्हा एकदा अभिनेत्री करीना कपूरसोबत काम करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रपटातील आमिरच्या लूकविषयी अनेक अंदाज बांधले जात आहेत. आमिर आपल्या हटके लूक आणि प्रयोगांसाठी ओळखला जातो. त्यामुळे या चित्रपटात आमिरचा कोणता नवा अवतार पाहायला मिळणार याची चाहते वाट पाहात आहेत. लालसिंग चड्ढा आगामी ख्रिस्मसला रिलीज करण्याची तयारी सुरु आहे.
हेही वाचा :
त्या’ व्हिडीओवरून ट्रोल; आमिरची कन्या नेटकऱ्यांवर भडकली
आमिर खानकडून ‘लक्ष्मी बॉम्ब’चं कौतुक, भावुक झालेला अक्षय कुमार म्हणतो…
‘…त्यावेळी मी खूप रडायचो’, आमिर खानने सांगितला आयुष्यातला सर्वात कठीण क्षण
व्हिडीओ पाहा :
Police complaint against Aamir Khan by BJP MLA alleging violation of COVID protocol