Kangana Ranaut | लॉकडाऊनमुळे कंगना मनालीला अडकली, मुंबई पोलिसांनी पोस्टाने समन्स पाठवला
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री कंगना रनौतला पोलिसांनी पोस्टाने समन्स पाठवलं आहे.
मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी (Police Sent Summons To Kangana Ranaut By Post) अभिनेत्री कंगना रनौतला पोलिसांनी पोस्टाने समन्स पाठवलं आहे. कंगनाचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी हे समन्स पाठवलं आहे. कंगना रनौत सध्या हिमाचल प्रदेश राज्यातील मनाली येथे तिच्या मूळ गावी गेली आहे. लॉकडाऊनमुळे ती मुंबईत येऊ शकत नाही (Police Sent Summons To Kangana Ranaut By Post).
Being Such A Talented Actor.. He was criticised by some hypocrites!
He deserves to be appreciated.. He gave so much to Bollywood.
But in return.. They took his life.
SHAME… #SSRDidntCommitSuicide#WeStandWithArnabForSSR pic.twitter.com/0ubMtKZAB4
— Kangana Ranaut (@KanganaOffical) July 23, 2020
कंगना रनौतचा (Actress Kangana Ranaut) जबाब घेण्याबाबत पोलिसांनी तिला 3 जुलै रोजी संपर्क साधला होता. मात्र, त्यावेळी कंगनाच्या कार्यलयातील कर्मचाऱ्यांनी समन्स घ्यायला नकार दिला होता. पोलीस कंगनाच्या जबाब घेण्याबाबत अधिकृत काहीच बोलत नव्हते. यामुळे कंगनाने ट्विट करुन आपल्याला जबाब द्यायचा आहे आणि पोलीस आपल्या संपर्कात असल्याचं ट्विट केलं होतं.
हेही वाचा : Kangana Ranaut | कंगना पोलखोल करण्याची शक्यता, मुंबई पोलीस चौकशीला बोलावण्याच्या तयारीत
कंगना ई-मेलद्वारे जबाब नोंदवण्यास तयार
“मला जबाब द्यायचा आहे. पण मी मनाली येथे आहोत. आता मी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे माझा जबाब ई-मेलद्वारे किंवा माझ्या कायदेशीर सल्लागार असलेल्या वकीलामार्फत घ्यावा” असं कंगनाने म्हटलं होतं. त्यामुळे अखेर पोलिसांनी आता अधिकृतपणे कंगनाचा जबाब घ्यायचा असल्याचं जाहीर केलं आहे.
आज सकाळी वांद्रे पोलीस स्टेशनचे एक अधिकारी कंगनाच्या कार्यालयात गेले होते. त्यांनी कंगनाला पुन्हा समन्स देण्याचा प्रयत्न केला. यावेळी कंगनाच्या कार्यालयातील कर्मच्याऱ्यांनी पुन्हा समन्स घेण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी तिथल्या कर्मच्याऱ्यांकडून कंगनाचा मनाली येथील पत्ता मिळवला आणि तिला थेट पोस्टाने मनालीला समन्स पाठवला आहे (Police Sent Summons To Kangana Ranaut By Post).
लॉकडाऊनमुळे कंगना गावी अडकली
लॉकडाऊनमुळे कंगना सध्या तिच्या मूळ गावी मनालीला अडकली आहे. मात्र, लॉकडाऊन शिथील होताच ती जबाब देण्यासाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा वरिष्ठ पोलीस अधिकारी व्यक्त करत आहेत.
-Did police Saw him hanging? -Did police find suicide note? -Did police find any stool? -Did police get CCTV footage? -Did police notice belt marks on his neck? -Did police seal flat & elec evidence?
Then how did police declare its suicide?#SSRDidntCommitSuicide
— Kangana Ranaut (@KanganaOffical) July 23, 2020
हेही वाचा : Kangana on Sushant Suicide | इंडस्ट्रीतील कंपूशाहीने सुशांतचा बळी घेतला, कंगनाचा बॉलिवूडवर संताप
सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Suicide) याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.
#Kangana on #SushantSinghRajput‘s demise. pic.twitter.com/FWSc5geWKV
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) June 15, 2020
Police Sent Summons To Kangana Ranaut By Post
संबंधित बातम्या
Sushant Singh Rajput | संजय लीला भन्साळी यांनी सुशांतबाबत पोलिसांना काय सांगितलं?
Sushant Singh Rajput | दिग्दर्शक शेखर कपूर यांचा मुंबई पोलिसांना धक्कादायक ई-मेल