Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Desai | कलेच्या माध्यमातून नवे विश्व निर्माण करणाऱ्या देसाईंच्या जाण्याने चटका; नितीन देसाईंच्या निधनाने राजकारणीही हळहळले..

विख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या वृत्ताने एकच खळबळ माजली आहे. आज सकाळी आलेल्या या बातमीने अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

Nitin Desai | कलेच्या माध्यमातून नवे विश्व निर्माण करणाऱ्या देसाईंच्या जाण्याने चटका; नितीन देसाईंच्या निधनाने राजकारणीही हळहळले..
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 2:02 PM

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : विख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी स्वत:च्या हाताने उभारलेल्या एन.डी. स्टुडिओत आयुष्य संपवल्याच्या बातमीमुळे एकच खबळबळ माजली. आज पहाटे ४.३० च्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त होत असून नितीन देसाई यांनी हे टोकाचे पाऊल उचलायल नको होते, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देसाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कलेच्या माध्यमातून नवे विश्व निर्माण करणाऱ्या देसाई यांचे जाणे चटका लावणारे आहे, अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला.

तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नरेश गणपत म्हस्के, अरविंद सावंत, निलेश राणे, विनोद तावडे , आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले यांनीही नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

हे सुद्धा वाचा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला शोक 

प्रिय नितीन देसाई, आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंग येऊनही त्यावर लीलया मात करणारे तुम्ही, जे करु ते भव्य दिव्यच करु हा ध्यास बाळगणारे तुम्ही … चित्रपटसृष्टीत कर्तृत्वाने मैलाचा दगड ठरलेले तुम्ही, तुमच्या कलासक्तवृत्तीने जग अधिक सुंदर बनविणारे तुम्ही. आयुष्य मोरपंखी आहे. रंग म्हणजे जगणं… आणि रंगात न्हाऊन निघणं म्हणजे आयुष्याचा जलतरंग, असेच म्हणाला होतात तुम्ही. अशी अचानक एक्झिट घ्याल असे कधी वाटलेच नव्हते. खूप वेदना देऊन गेले. माझी विनम्र श्रद्धांजली!! ॐ शांती… 

नितीन देसाई यांचे जाणे वेदनादायी – नरेश म्हस्के

शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनीही देसाई यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ‘नितीन देसाई हे माझे जुने मित्र, नेहमी मार्गदर्शन करणारे ,माझ्याबद्दल नेहमीच चांगली इच्छा ठेवणारे .धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर जेव्हा पहिल्यांदा टेंभीनाक्यावरील देवीचा सेट नितिन देसाई यांनी केला त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत अनेकदा भेटण्याचा योग आला.अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यासोबत माझी चांगली मैत्री झाली. ‘बालगंधर्व आता न होणे’ हा कार्यक्रम जेव्हा मी केला त्यावेळी त्यांनी त्याचे भरभरुन कौतुक केले .

ठाण्यात अनेक जाहीर कार्यक्रमाच्या चर्चेसाठी एकत्र भेटून आम्ही काम करायचो असे मैत्रीपूर्ण संबंध त्यांचे होते. संपूर्ण देशात नावलौकिक असलेल्या टेंभीनाक्यावरील नवरात्रौत्सवाच्या सेटचे काम ते अत्यंत मनापासून करायचे, सेट कसा असावा, कोणती प्रतिकृती साकारायची यासाठी तासनतास आमच्या गप्पा व्हायच्या. ठाण्यात नवीन कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू होती, सहा महिन्यातून एकदा तरी आवर्जून फोन करणारा मित्र अचानक जाणे ही बातमी काळजाला अत्यंत वेदना देणारी घटना आहे.

कर्जत येथील एन.डी स्टुडिओवर त्याचा प्रचंड जीव होता. या स्टुडिओबद्दल ते नेहमी भरभरुन बोलायचे, माझा स्टुडिओ पाहायला या असे नेहमी सांगायचे परंतु कामाच्या गडबडीत जाता आले नाही ही हूरहूर कायम मनात राहील. अत्यंत प्रिय असलेल्या या स्टुडिओमध्ये त्यांनी आपले जीवन संपविले. त्यांचे जाणे हे कलाविश्वासाठी दु:खद घटना आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी व्यक्तीश: सामील आहे. तसेच त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं दु:ख

आमचे मित्र, सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आणि मनाला चटका लावून जाणारी आहे. चित्रपट क्षेत्रात उत्तम कला दिग्दर्शक म्हणून त्यांची जगभरात ख्याती होती. कला क्षेत्रातलं त्यांचं अमूल्य योगदान कायम स्मरणात राहील. त्यानां भावपूर्ण श्रद्धांजली!!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विट

ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे आज निधन झाले. ही अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे. मराठी, हिंदी कलासृष्टीत आपल्या कलेच्या माध्यमातून नवे विश्व निर्माण करणाऱ्या देसाई यांचे जाणे चटका लावणारे आहे.

टेंभी नाक्याची देवी आणि नितीन देसाई यांचे वेगळे ऋणानुबंध होते. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा त्यांनी कायम जपली होती. येथील नवरात्रोत्सव त्यांच्यामुळे कायम अविस्मरणीय झाला. त्यांच्या हातून घडलेली कलाकृती पाहण्याची कायम उत्सुकता असे. इतका उमदा माणूस आणि मित्र आज आपण गमावल्याचे वृत्त वेदनादायी आहे. वैयक्तिक माझ्यासाठी आणि कलाक्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत दु:खद आहे. त्यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

आदित्य ठाकरेनींही व्यक्त केला शोक

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई ह्यांनी कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये आत्महत्या केल्याची बातमी धक्कादायक आहे. भारताने प्रचंड ताकदीचा आणि प्रतिभेचा कलावंत आज गमावला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली आणि ह्या धक्क्यातून, दुःखातून लवकर सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो ही इश्वरचरणी प्रार्थना !

तर जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा! अशा शब्दांत विनोद तावडे यांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली.

निलेश राणेंनीही देसाई यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

सिनेक्षेत्रातील एका अनुभवी आणि हरहुन्नरी दिग्दर्शकास नितीन देसाई यांना आपण मुकलो आहोत. त्यांची संपूर्ण कारकीर्द यशस्वी स्वतःच्या कर्तुत्वाने त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अरविंद सावंत यांची श्रद्धांजली

मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...