मुंबई : 2 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सर्वाइकल कॅन्सरने तिचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. पूनमच्या पीआर टीमकडून, मॅनेजरकडून तिच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला गेला आहे. मात्र तरीही अद्याप पूनमचं निधन कोणत्या रुग्णालयात, कधी झालं यांसारख्या प्रश्नांबाबत अद्याप सर्वांनीच मौन बाळगलं आहे. तिच्या मृत्यूसंदर्भात काही प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. शिवाय तिच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.
पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहित तिच्या निधनाविषयीची माहिती देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. तुम्हाला हे सांगताना अतीव दु:ख होत आहे की सर्वाइकल कॅन्सरमुळे आम्ही पूनम पांडेला गमावलं आहे. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी ती प्रेमाने भेटली. या दु:खाच्या क्षणी तुम्ही आमच्या खासगी आयुष्याचा आदर कराल, अशी अपेक्षा आहे.’ ही पोस्ट व्हायरल होताच अनेकांना मोठा धक्का बसला. मात्र हा एखादा पब्लिसिटी स्टंट किंवा अकाऊंट हॅकचं प्रकरण असावं असं अनेकांना वाटलं होतं. अखेर त्यांच्या टीमने पूनमच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र त्यांनी तिच्या मृत्यूसंदर्भात अधिक कोणतीच माहिती दिली नाही. पूनमच्या निधनावरून बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
असे काही प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. तिच्या टीमपासून कुटुंबीयांपर्यंत सर्वांनीच या प्रश्नावर मौन बाळगलं आहे. यादरम्यान प्रसिद्ध डिझायनर रोहित वर्माच्या एका पोस्टनेही आणखी प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहितने त्याच्या पोस्टद्वारे सांगितलंय की दोन दिवसांपूर्वीत मुंबईत त्याने पूनमसोबत एका शूटिंगसाठी काम केलं होतं. त्यामुळे अचानक असं काही घडावं याची कल्पनासुद्धा त्याने केली नव्हती. एका मुलाखतीला दिलेल्या मुलाखतीत रोहित वर्मा म्हणाला, “दोन दिवसांपूर्वी शूटिंगदरम्यान पूनम अत्यंत तंदुरुस्त आणि स्वस्थ दिसत होती. तिला कॅन्सर झाला असेल असं किंचितही वाटलं नव्हतं.”