मुंबई : माॅडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. पूनम पांडे हिने अवघ्या 32 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पूनम पांडे हिच्या निधनानंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहे. पूनम पांडे हिच्या मॅनेजरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निधनाच्या बातमीला दुजोरा दिला खरा मात्र, अनेक मोठे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. हेच नाही तर नेमके पूनम पांडे हिचे निधन झाले कुठे हे देखील कळत नाहीये. पूनम पांडे हिचे निधन गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे हे सांगितले जातंय की, पूनम पांडे हिने सुसाईट केले.
पूनम पांडे हिच्यावर अंत्यसंस्कार हे मुंबईमध्येच होणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, आता पूनम पांडे हिच्या अंत्यदर्शनासाठी गेलेल्या चाहत्यांना मोठा झटका बसल्याचे बघायला मिळतंय. पूनम पांडे ही लोखंडवालामधील ज्या इमारतीमध्ये राहते. त्याठिकाणी पूनमच्या अंत्यदर्शनासाठी काही चाहते हे पोहचले. मात्र, तिथे गेल्यावर चाहत्यांना मोठा झटका बसला.
लोखंडवालामधील पूनम पांडे राहत असलेल्या परिसरात तिच्या निधनाबद्दल कोणीही काहीही भाष्य करण्यास तयार नाहीये. फक्त हेच नाही तर पूनम पांडे हिची बहिण मुंबईतील वरळी भागामध्ये राहते. मात्र, पूनमच्या बहिणीचा फोन देखील सतत बंद येतोय. लोखंडवाला येथे चाहते गर्दी करताना देखील दिसत आहेत.
अखेर पूनम पांडे हिचा मृतदेह नेमका कुठे आहे, हा प्रश्न सातत्याने चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. हेच नाही तर पूनम पांडे हिच्या अंत्यसंस्काराबद्दलही काहीच अपडेट नाहीत. नेमके कुठे पूनम पांडे हिच्यावर अंत्यसंस्कार करणार हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित होताना दिसतोय. आता पूनम पांडे हिच्या मृत्यूबाबत काही मोठे खुलासे होऊ शकतात.
पूनम पांडे हिने बाॅलिवूड चित्रपटांपासून करिअरची सुरूवात केली. पूनम पांडे ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. आलिशान गाड्यांचे मोठे कलेक्शन देखील पूनम पांडे हिच्याकडे आहे. पूनम पांडे हिच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसलाय. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केल्याचे बघायला मिळतंय.