Adipurush | ‘आदिपुरुष’च्या पहिल्या गाण्याचा विक्रम; अवघ्या 24 तासांत ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ

| Updated on: May 21, 2023 | 8:33 AM

येत्या 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र टीझरवर आलेल्या प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिसादानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला.

Adipurush | आदिपुरुषच्या पहिल्या गाण्याचा विक्रम; अवघ्या 24 तासांत ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ
Adipurush
Image Credit source: Youtube
Follow us on

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटातील पहिलं गाणं रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. मराठीतील प्रसिद्ध संगीतकारांची जोडी अजय आणि अतुल गोगावले यांनी आदिपुरुषमधील ‘जय श्रीराम’ हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असून गेल्या 24 तासांत युट्यूबवर त्याला विक्रमी व्ह्यूज मिळाले आहेत. युट्यूबवर गेल्या 24 तासांत हा सर्वांधिक पाहिला गेलेला व्हिडीओ ठरला आहे. अक्षय कुमारच्या ‘क्या लोगे तुम’ या व्हिडीओलाही ‘जय श्रीराम’ गाण्याने मागे टाकलं आहे.

या गाण्याविषयी अजय गोगावले म्हणाले, “गाण्याच्या नावातूनच आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. या चित्रपटासाठी आम्ही हे पहिलंच गाणं संगीतबद्ध केलं आहे. जेव्हा आम्हाला या गाण्याची ऑफर मिळाली होती, तेव्हाच आम्हाला त्याच्या भव्यतेविषयी माहिती देण्यात आली होती. श्रीराम हा शब्द ऐकताच ती शक्ती आणि भक्ती आपोआप आमच्यात आली. हे संपूर्ण गाणं तयार करत असताना ती जादुई शक्ती आमच्यासोबत होती.” या गाण्याला युट्यूबवर आतापर्यंत 26,291,237 व्ह्यूज आणि 484,186 लाइक्स मिळाले आहेत.

पहा गाणं

हे सुद्धा वाचा

गीतकार मनोज मुंतशीर यांचे आभार मानत अजय पुढे म्हणाले, “त्यांनी हे गाणं खूपच सुंदर लिहिलं आहे. त्यांच्या शब्दांनी गाण्याची ताकद वाढवली आहे. हे फक्त तेच करू शकतात. त्याचप्रमाणे हे गाणं यासाठी खास आहे कारण बऱ्याच काळानंतर असं गाणं फक्त एका गायकाने नाही तर 30 जणांनी मिळून गायलं आहे.”

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. यामध्ये प्रभासने राघव, क्रिती सनॉने जानकी, सनी सिंगने लक्ष्मण आणि सैफ अली खानने लंकेशची भूमिका साकारली आहे. येत्या 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र टीझरवर आलेल्या प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिसादानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पाच ते सहा महिन्यांची मुदत वाढवून घेतली.

“त्या पाच – सहा महिन्यांचा कालावधी मिळणे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आव्हानं प्रत्येक गोष्टीत असतात. पण ही आव्हानं आमच्या चित्रपटाला अधिक चांगला आणि मजबूत बनवेल. आम्ही अशा तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे जो मार्व्हल, डीसी, अवतार यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवला गेला”, असं ओम राऊत म्हणाले.