कायम त्याच्या प्रेमात असते… हे आहे प्राजक्ता माळीचं प्रेम; अखेर मनातलं बोलूनच टाकलं
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. विशेषत: तिच्या लग्नाबद्दल किंवा तिच्या प्रेमाबद्दल. तिला एका मुलाखतीत तिला असाच एक प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने स्वत:च तिच्या क्रशबद्दल सांगितलं होतं.

बॉलिवूडप्रमाणे मराठी इंडस्ट्रीतील कलाकरांबद्दलही चाहत्यांना तेवढंच जाणून घ्यायला आवडतं. त्यात मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल तर सर्वांनाच जाणून घ्यायला उत्सुकता असते. मग तिच्या पर्सनल लाइफबद्दल असो किंवा मग तिच्या सिनेमांबद्दल असो सर्वांनाच जाणून घेण्याबद्दल आतुरता असते.
प्राजक्ता माळीच्या प्रेमाबद्दल किंवा तिच्या लग्नाबद्दलही चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते
जसं की प्राजक्ता माळीच्या प्रेमाबद्दल किंवा तिच्या लग्नाबद्दलही चाहते नेहमीच तिला विचारत असतात. एवढंच नाही तर अनेक मुलाखतींमध्येही तिला हा प्रश्न विचारण्यात आला आहे. प्राजक्ता माळी ही उत्तम अभिनेत्री, कवयित्री आणि बिझनेसवुमन आहे. प्राजक्ता माळी लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. प्राजक्ता माळीला अनेकदा हे विचारण्यात आलं आहे की तिला लग्नासाठी कसा मुलगा हवा आहे. त्यावर तिने रंजकपणे काही गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर केलेल्या आहे.
प्राजक्ताने तिच्या प्रेमाबद्दलही सांगितलं
पण एकदा प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत स्वत: तिच्या क्रशबद्दल सांगितलं होतं. तिला एक अभिनेता प्रचंड आवडतो. ती फारच भरभरून तिच्या क्रशबद्दल बोलली होती. तिचा क्रश कोण आहे तुम्हाला माहित आहे का? प्राजक्ता माळीचा क्रश हा बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आहे. प्राजक्ता माळीला रणबीर कपूर खूप आवडतो. तसेच तिला वैभव तत्ववादीही तेवढाच आवडतो असही तिने सांगितलं होतं.पण रणबीर कपूर हे तिचं प्रेम असल्याचं तिने म्हटलं आहे. “मी कायमच त्याच्या प्रेमात असते” असही ती म्हणाली होती.
“रणबीर मला खूप आवडतो कारण…”
रणबीरमधील कोणती गोष्ट तिला सर्वात जास्त आवडते याबद्दलही तिने सांगितलं होतं. ती म्हणाली होती की, “रणबीर मला खूप आवडतो. तो सोशल मीडियावर फार अॅक्टीव देखील नाहीये. तो त्याचं वैयक्तिक आयुष्य शेअर करत नाही. त्याच्या आसपासच्या लोकांकडून त्याचं सोशल आयुष्य आपल्याला दिसतं. त्याने एका मुलाखतीत खूप चांगला मुद्दा मांडला होता की जर मी माझं आयुष्य सोशल मीडियावर टाकलं तर त्याचा परिणाम मी सिनेमात ज्या भूमिका साकारतोय त्यावर होईल. मी कसा आहे हे लोकांना कळलंच नाही पाहिजे म्हणजे सिनेमात मी जे दिसतो ते लोकांना स्वीकारायला सोपं जाईल. मला ते खूप आवडलं. माणूस म्हणून तुम्ही कसे आहात ते कळणं किंवा सतत दिसत राहणं या गोष्टी मारक ठरतात.” असं म्हणत तिने त्याचं तोंडभरून कौतुकही केलं होतं. तसेच त्याच्याकडून कोणती गोष्ट किती शिकण्यासारखी आहे त्याबद्दलही मोकळेपणाने सांगितलं.
दरम्यान प्राजक्ताच्या आवडीच्या अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये दाक्षिणात्त्य अभिनेते नानी तसेच जयम रवी देखील आहे. प्राजक्ता हास्य जत्रा तर करतेच पण सोबतच चित्रपटांमधूनही ती प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे.