प्राजक्ताचा यूटर्न,सुरेश धसांचे तोंडभरून कौतुक; प्राजक्ताचा नवा व्हिडीओ समोर
पत्रकार परिषद घेऊन सुरेश धसांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत प्राजक्ताने पत्रकार परिषद घेतली होती. तसेच सुरेश धसांनी माफी मागावी अशी मागणीही केली होती. मात्र आता धसांनी माफी मागितल्यानंतर प्राजक्ताच्या भूमिकेनं युटर्न घेतला असून सुरेश धसांबद्दल तोंडभरून कौतुक केलं आहे. तिचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे.
सुरेश दसांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीबाबत केलेल्या काही वक्तव्याबद्दल प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत राग व्यक्त करत सुरेश धसांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. प्राजक्ताची पत्रकार परिषद चांगलीच चर्चेत आली होती. एवढच नाही तर तिने आमदार सुरेश धस यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. तसेच तिने महिला आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती.
मात्र आता अभिनेत्रीने तिची भूमिका बदलत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. सुरेश धसांनी प्राजक्ताची माफी मागितल्याने प्राजक्तानेही आता या वादावर पडदा टाकला आहे.
एवढच नाही तर तिने एका व्हिडीओद्वारे सुरेश धस यांचे आभारही मानले आहेत. शिवाय तिने पत्रकारपरिषद घेण्याची भूमिका का घेतली तसेच हा वाद पुढे घेऊन जाण्याचं कारणही प्राजक्ताने या व्हिडीओमध्ये सांगितलेलं आहे.
पाहुयात प्राजक्ता माळीने व्हिडीओ करत नक्की काय भूमिका मांडली आहे.
सुरेश धसांचे आभार मानले
“माननीय आमदार श्री सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली दादा खूप धन्यवाद असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं” असं म्हणत तिने सुरेश धसांचे आभार मानले.
‘…तर मी आज इथे नसते’
तसेच पुढे प्राजक्ता म्हणाली की, धस साहेब बोलले नसते तर हे सगळं करण्याची गरज नव्हती असही तिने म्हटलं आहे. ” गेल्या दोन दिवसांपासून आणखी दोन मुद्दे फार चर्चे गेले आणि त्याबद्दलही या निमित्ताने बोलू इच्छिते मी पत्रकार परिषदेतही म्हटलं होतं की धस साहेब बोलले त्यामुळे आज मला पत्रकार परिषद घ्यावी लागली ते नसते बोलले तर आज मी तुमच्या समोर नसते. त्यामुळे कुठल्याही आंदोलन कुठलाही मोर्चा, कुठलीही मोहीम त्याला डिस्टर्ब करण्याचा माझा हेतू नव्हता होता. माझ्या मार्फत कोणा दुसऱ्याचाही हा हेतू नव्हता हे तुम्ही नमूद करू इच्छिते जाहीर करू इच्छिते आणि खरोखर बोलले नसते तर आज मला हे सगळं करायचे काही गरजच पडली नसती.” असं म्हणत प्राजक्ताने तिची भूमिका स्पष्ट केली आहे.
“माझ्या बाजूने वादावर पडदा टाकते”
तसेच सुरेश धस यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. तिने म्हटलं आहे ” सुरेश धस यांनी मोठ्या मनाने माझी माफी मागितली आहे. त्यामुळे आता मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाहीये. मी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू इच्छित नाही. तसेच माझ्याकडूनही मी या वादावर संपूर्ण पडदा टाकतेय” असं म्हणत प्राजक्तानेही तिच्या बाजूने या वादाला पूर्णविराम दिला आहे.तसेच तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचेही आभार मानले.
संतोष देशमुख यांच्या हत्येविषयीही हळहळ
प्राजक्ताने संतोष देशमुख यांच्या हत्येविषयीही हळहळ व्यक्त केली, ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे ती म्हणाली. गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, या सबंध महाराष्ट्राच्या मतासोबतच ती असल्याचे प्राजक्ताने स्पष्ट केले.