Pravin Tarde : कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसात खाल्ला; अभिनेता अमोल धावडेंच्या निधनावर प्रवीण तरडेंची भावूक पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टीत आता शोकाकळा पसरली आहे. अभिनेते अमोल धावडे यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. (Pravin Tarde's emotional post on the demise of actor Amol Dhavade)

Pravin Tarde : कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसात खाल्ला; अभिनेता अमोल धावडेंच्या निधनावर प्रवीण तरडेंची भावूक पोस्ट
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 5:30 PM

मुंबई : सध्या देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. तर राज्यात ऑक्सिजन अभावी अनेक कोरोना रुग्णांचा जीव जातोय. अशात मराठी चित्रपटसृष्टीतही आता शोकाकळा पसरली आहे. अभिनेते अमोल धावडे (Amol Dhavade) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. अवघ्या 15 दिवसात झालेल्या कोरोना संक्रमणानं त्यांचा मृत्यू झालाय.

प्रवीण तरडेंनी दिली माहिती

अभिनेते दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. अभिनेते अमोल धावडे हे प्रवीण तरडे यांचे जवळचे मित्र होते. देवूळबंद , मुळशी पॅटर्न या चित्रपटांमध्ये ते झळकले आता तरडेंच्या सरसेनापती हंबीरराव या चित्रपटातही त्यांचा सीन असल्याची माहिती आहे.

प्रवीण तरडेंची फेसबुक पोस्ट

‘माझा मित्र अमोल धावडे गेला, कोरोनानं आज एक निर्व्यसनी रोज व्यायाम करणारा धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या 15 दिवसात खाल्ला. किती आठवणी ..? 1996 साली मी लिहिलेल्या “आणखी एक पुणेकर ” या एकांकीकेत पहिला डायलॅाग याने म्हटला होता म्हणुन, माझ्या प्रत्येक सिनेमात एक तरी सीन अमोलसाठी लिहायचोच.. देवूळबंद , मुळशी पॅटर्न आणि आता सरसेनापती हंबीरराव प्रत्येक सिनेमात अमोल आहेच .. 11 मे ला अमोलचा वाढदिवस म्हणुन तिन्ही सिनेमांचं डबिंग आत्ता पर्यन्त त्याच्या वाढदिवसाला त्याच्या डायलॅाग ने सुरू करायचो .. हा माझा एक श्रध्देचा भाग होता.. खुप मोठा बांधकाम व्यवसायिक पण एका शब्दावर देईल तो सीन करायला यायचा .. 1999 साली आपण पुरुषोत्तम जिंकला तेंव्हा तु कडकडून मारलेली मीठी कशी विसरू रे मित्रा .. एकत्र नॅशनल खेळलो , एकांकीका केल्या , सिनेमे केले आणि आज एकटाच कुठेतरी निघून गेलास .. तुझा शेवटचा मेसेज होता ” बाय बाय प्रविण बहुदा सरसेनापती हंबीरराव सिनेमा पाहायचा राहणार राव ” राहिलाच शेवटी .. डोळ्यातील पाणी थांबत नाही ये रे आमल्या .. जिथे कुठे असशील सुखी राहा .. नाही तरी मी आणि पिट्या तुला “सुखी जीव “ असच म्हणायचो की .. सुखी राहा .. कुटुंबाची काळजी करू नको आम्ही आहोत मित्रा.’

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी अमोल धावडे यांना श्रद्धांजली दिली आहे.

संबंधित बातम्या

Video : इफ्तारच्या प्रतीक्षेत गौहर खानची हालत खराब…व्हिडीओ शेअर

Trishala Dutt : सात वर्षांच्या रिलेशनशिप नंतर ब्रेकअप…, संजय दत्तची मुलगी त्रिशालाने सांगितली खासगी गोष्ट

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.