प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ चित्रपट पाहिल्यानंतर खास मित्राने दिला Review, म्हणाला “प्राजू…”

प्राजक्ता माळीची निर्मिती असलेला फुलवंती हा चित्रपट शुक्रवारी 11 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबतच या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनीही झळकत आहे.

प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' चित्रपट पाहिल्यानंतर खास मित्राने दिला Review, म्हणाला प्राजू...
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 5:01 PM

Prajakta Mali Phulwanti Movie Review : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. प्राजक्ताने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या अनेक मालिकांतून ती घराघरात पोहोचली. आता प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. प्राजक्ता माळीची निर्मिती असलेला फुलवंती हा चित्रपट शुक्रवारी 11 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबतच या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनीही झळकत आहे. आता नुकतंच प्राजक्ता माळीच्या एका जवळच्या मित्राने या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. याच कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता पृथ्वीक प्रताप हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध गोष्टींवर भाष्य करत असतो. आता पृथ्वीकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने प्राजक्ता माळीच्या फुलवंती चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे.

पृथ्वीक प्रतापची पोस्ट

“तुझ्या पहिल्या वहिल्या निर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा मैत्रिणी, अतिउत्तम अभिनय, दिग्दर्शन, लेखन, संगीत, छायाचित्रण, वेशभूषा आणि कथा. खूप काळानंतर असा डोळे दिपवून टाकणारा सिनेमा पाहिला. या सिनेमाचा छोटासा भाग करून घेतल्याबद्दल स्नेहल तरडे, प्रवीण तरडे, मंगेश पवार आणि आमच्या फुलवंतीचे म्हणजे प्राजूचे खूप खूप आभार. #फुलवंती उद्या पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये, #ब्रम्हार्पणवस्तू”, असे अभिनेता पृथ्वीक प्रतापने म्हटले आहे.

पृथ्वीक प्रतापने या पोस्टसोबत काही फोटोही शेअर केले आहेत. यातील पहिल्या दोन फोटोत तो प्राजक्तासोबत उभा असल्याचे दिसत आहे. तर शेवटच्या फोटोत त्याने फुलवंती चित्रपटातील भूमिकेचा फोटो पोस्ट केला आहे. यात पृथ्वीक प्रताप, समीर चौघुले, वनिता खरात, प्रसाद खांडेकर, चेतना भट हे कलाकार पारंपारिक पोशाख परिधान केल्याचे दिसत आहेत.

‘फुलवंती’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान प्राजक्ता माळीची निर्मिती असलेला पहिला चित्रपट आज ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘फुलवंती’ असे तिच्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच संपूर्ण कलाविश्वातून प्राजक्तावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.