मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी यांच्यासोबत आनंदी जीवन जगत आहे. पण काही वर्षांपूर्वी प्रियांका हिने माजी सचिव प्रकाश जाजू यांच्याविरोधात धमकावणे आणि विनयभंगासारखे गंभीर आरोप केले होते. २००८ साली दाखल केलेल्या गुन्हा २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. प्रियांका आणि प्रकाश जाजू यांनी वाद परस्पर सामंजस्याने सोडवल्यामुळे जाजू यांच्याविरोधातील गुन्हे न्यायालयाने रद्द केले आहेत. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि पीके चव्हाण यांच्या खंडपीठाने प्रकाश जाजू यांच्यविरोधातील गुन्हे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहेत.
प्रियांकाच्या तक्रारीवरुन दाखल केलेला गुन्हा आणि पोलिसांकडून दाखल करण्यात आलेले आरोपपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रकाश जाजू यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. याप्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान प्रियांका चोप्रा देखील व्हीडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून न्यायालसमोर उपस्थित होती.
कोणत्याही अटी शिवाय प्रियांकाने माफी दिल्यानंतर दाखल केलेल्या शपथपत्रावर अभिनेत्रीने सहमती दर्शवली. त्याचसोबत जाजू यांच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करायला हरकत नसल्याचं देखील प्रियांकाने सुनावणी दरम्यान सांगितलं. प्रियांकाच्या जबाबानंतर न्यायालयाने जाजू यांच्याविरोधातील गुन्हे रद्द केले आहेत.
काय आहे प्रकरण?
2008 मध्ये प्रियांका चोप्रा हिने प्रकाश जाजू यांच्या विरोधात वर्सोवा पोलीस स्ठानकात धमकावणे आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जाजू यांच्याविरोधात गुन्हा आणि आरोपपत्रही दाखल केले.
प्रकाश जाजू यांनी आक्षेपार्ह आणि अश्लिल मेसेज केल्याचे आरोप प्रियांकाने केले होते. पण आता जाजू यांच्याविरोधातील आरोप न्यायालयाने रद्द केले आहेत. प्रियांका आणि प्रकाश जाजू यांनी वाद परस्पर सामंजस्याने सोडवल्यामुळे जाजू यांच्याविरोधातील गुन्हे न्यायालयाने रद्द केले आहेत.
प्रियांकाने केलेले आरोप रद्द केल्यानंतर, न्यायालयाने जाजू यांनी पोलीस कल्याण फंडामध्ये ५० हजार रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सांगायचं झालं तर प्रकाश जाजू प्रियांका हिच्यासाठी २००१ ते २००४ मध्ये सचीव म्हणून काम पाहात होते. आता अनेक वर्षांनंतर जाजू यांना याप्रकरणातून दिलासा मिळाला आहे.