Oscar 2021 | प्रियंका चोप्रा-राजकुमार रावच्या ‘द व्हाईट टायगर’ला ऑस्कर नॉमिनेशन!
नव्या वर्षाच्या सुरूवातीला बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) यांचा ‘द व्हाईट टायगर’ (The White Tiger) हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.
मुंबई : नव्या वर्षाच्या सुरूवातीला बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) यांचा ‘द व्हाईट टायगर’ (The White Tiger) हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रियांका आणि राजकुमार यांच्यासह गौरव आदर्श मुख्य भूमिकेत दिसला होता. प्रियंका चोप्रा हिने पती निक जोनाससमवेत सोमवारी ऑस्कर 2021ची (Oscar Nomination) नामांकन जाहीर केली आणि या यादीमध्ये त्यांचा ‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटाने देखील आपले स्थान मिळवले आहे. \ प्रियंका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले आहे (Priyanka Chopra and Rajkummar Rao starrer The White Tiger gets Oscar nomination).
‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटाचा अडॉप्टेड स्क्रीनप्ले प्रकारात समावेश करण्यात आला आहे. ऑस्करमध्ये नामांकन मिळाल्यानंतर प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. प्रियंका चोप्राने ट्विट केले की, ‘आम्हाला ऑस्करमध्ये नामांकन मिळाले आहे. ‘द व्हाईट टायगर’ टीम आणि रमीन तुम्हाला खूप शुभेच्छा. चित्रपटाची नामनिर्देशन स्वत: जाहीर करताना मला खूप आनंद वाटला. मला सर्वांचा अभिमान आहे.’
प्रियंका चोप्राची पोस्ट :
We just got nominated for an Oscar! Congratulations Ramin and team #TheWhiteTiger. Somehow announcing the nomination myself made it so much more special. So so proud ❤️@_GouravAdarsh @RajkummarRao #RaminBahrani
(1/2) pic.twitter.com/btgCgOJ67h
— PRIYANKA (@priyankachopra) March 15, 2021
राजकुमार राव यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आनंद व्यक्त केला. त्याने लिहिले, ‘आम्हाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले आहे. अभिनंदन रामीन बहरानी आणि ‘द व्हाईट टायगर’ टीम.’ राजकुमार याच्या या पोस्टनंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
राजकुमार रावची इंस्टाग्राम पोस्ट :
View this post on Instagram
(Priyanka Chopra and Rajkummar Rao starrer The White Tiger gets Oscar nomination)
‘द व्हादर टायगर’समवेत ‘द फादर’, ‘नोमॅडलॅड’, ‘वन नाईट इन मियामी’ यांना अडॉप्टेड स्क्रीनप्ले प्रकारात नामांकन देण्यात आले आहे.
भारताने आतापर्यंत पटकावलेले ऑस्कर
दरवर्षी देखील बॉलिवूडची ऑस्करवारीची वाट बघते असते. भारताने आतापर्यंत 5 वेळा ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे. भानु अथैया यांना प्रथम ‘गांधी’ चित्रपटासाठी कॉस्ट्यूम डिझायनरचा ऑस्कर पुरस्कार मिळवला होता. त्यानंतर सत्यजित रे यांना 1992मध्ये ऑस्कर ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2009मध्ये ए.आर. रहमान, रसुल पुकुट्टी आणि गुलजार यांना ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
कोणाकोणाला नामांकन?
यंदाचा ऑस्कर सोहळा 25 एप्रिल रोजी पार पडणार आहे. 2020मध्ये रिलीज झालेल्या ‘मँक’ चित्रपटाला विविध श्रेणींमध्ये 10 नामांकने मिळाली आहेत. त्याच वेळी, ‘नोमॅलॅड’, ‘द ट्रायल ऑफ द शिकागो 7’, ‘प्रॉमिसिंग यंग वूमन’ आणि ‘जुडास आणि द ब्लॅक मसिहा’ यांनी बर्याच प्रकारात आपले स्थान बनवले आहे. चॅडविक बोसमॅनला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक श्रेणींमध्ये नामांकने मिळाली आहेत.
चॅडविक बोसमॅन यांचे गेल्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर चॅडविक बोसमॅनचा ‘Ma Rainey’s Black Bottom’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळाले आहे. याशिवाय दक्षिण कोरियन ड्रामा ‘मीनारी’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रकारातही नामांकन मिळालं आहे.
(Priyanka Chopra and Rajkummar Rao starrer The White Tiger gets Oscar nomination)
हेही वाचा :
SSR Drugs Case | रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार, NCBकडून जामिनाविरोधात याचिका दाखल!