प्रियांका चोप्राने हजारोंच्या गर्दीसमोर पतीसोबत केलं लिपलॉक; निकला मिळाला हा खास सन्मान
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे ज्यामध्ये ती एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर तिचा पती निक जोनससोबत लिप-लॉक करताना दिसत आहे. हजारो चाहत्यांसमोर प्रियांकाने एकदा नाही तर दोनदा तिच्या निकला किस केलं. या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयासाठी आणि तिच्या सकारात्मक विचारांसाठी नेहमीच चर्चेत असते. प्रियांका नेहमी बिनधास्तपणे तिचे विचार मांडत असते. तिने बॉलिवूडपासून ते हॉलिवूडमध्येही तिने आपलं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे आणि आता ती एका दक्षिण भारतीय चित्रपटातही काम करत आहे. प्रियांका चोप्रा नुकतीच एसएस राजामौली आणि महेश बाबू यांच्या ‘एसएसएमबी 29’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारतात आली होती. ओडिशामध्ये चित्रपटाचे वेळापत्रक पूर्ण केल्यानंतर ती अमेरिकेत परतली आहे.
निकला मिळाला खास सन्मान, प्रियांकाने केलं सर्वांसमोर किस
अमेरिकेत परतल्यानंतर, प्रियांका चोप्राने एका कार्यक्रमात सहभाग घेतला जो तिच्यासाठी तसेच तिचा पती निक जोनास आणि त्याचा भाऊ जो आणि केविन जोनससाठी खास होता. जोनस ब्रदर्सचे नाव ‘न्यू जर्सी हॉल ऑफ फेम’ मध्ये नोंदवण्यात आले आहे. कमी वयात हा पराक्रम करणारे तरूण म्हणून या तिघांचाही खास सन्मान करण्यात आला. यावेळी प्रियांकाही उपस्थित होती. तेव्हा पतीला मिळालेला हा सन्मान पाहून तिने हजारो चाहत्यांच्या गर्दीसमोर निकला किस केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
हजारोंच्या गर्दीसमोर प्रियांकाने निकला केलं लिप-लॉक, प्रेक्षकांनी केला एकच जल्लोष
जोनास ब्रदर्सच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामध्ये प्रियांकाचा पती निक जोनास त्याच्या भावांसोबत स्टेजवर दिसत आहे. याशिवाय, अनेक संगीतकार देखील मंचावर उपस्थित असलेले पाहायला मिळतायत. कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या व्यक्ती सांगताना दिसत आहे की, जोनस ब्रदर्स सर्वात कमी वयात ‘न्यू जर्सी हॉल ऑफ फेम’ मध्ये सामील झाले आहेत. नंतर, प्रियांका चोप्रा आणि जोनस कुटुंबातील इतर सदस्य देखील स्टेजवर येतात. यादरम्यान, प्रियांका चोप्राने तिच्या पतीला मिठी मारली आणि स्टेजवरच सर्वांसमोर त्याला लिप-लॉक केलं. यावर चाहत्यांनी मोठ्याने जल्लोष केला. प्रियांका स्टेजवरून निघू लागली तेव्हाही तिने तिच्या पतीच्या ओठांची किस घेतली.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.तसेच निकचे कौतुकही केले आहे.