नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या अनेक मुलाखती देत आहे. यादरम्यान तिने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. प्रियांका चोप्रा आपल्या कुटुंबियांच्या खूप जवळ आहे. विशेषतः तिला वडिलांची खूप आठवण येते. त्यातच अभिनेत्रीने नुकताच खुलासा केला आहे की, परदेशात 3 वर्षे घालवून परत आल्यावर ती पूर्वीसारखी नव्हती. वडिलांना ही वस्तुस्थिती मान्य करायला खूप वेळ लागला.
अभिनेत्रीने पॉडकास्ट संभाषणादरम्यान सांगितले की, वयाच्या 13 व्या वर्षी ती परदेशात तिच्या काका-काकूंच्या घरी गेली होती. तेथून भारतात परत आल्यावर तिच्या शरीराचा कायापालट झाला होता. तिचा लूक कर्व्ही दिसू लागला होता आणि तिच्या वडिलांना हे मान्य नव्हते. स्त्रीसारख्या दिसणाऱ्या या तरुणीचे काय करावे, हे त्यांना समजत नव्हते.
याबद्दल बोलताना प्रियांका चोप्राने सांगितले की, हा एक काळ होता जेव्हा तिचा स्वभाव लक्षवेधक बनला होता आणि तिला मुले आवडत होती. एके दिवशी तिच्या वडिलांनी एक मुलगा प्रियांकाच्या खोलीच्या खिडकीकडे डोकावताना पाहिला तेव्हा त्यांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी प्रियांकावर बंधने घालायला सुरुवात केली. प्रियांकाच्या वडिलांनी तिच्या खोलीच्या बाल्कनीत बार लावले. यासोबतच प्रियांकाला पाश्चिमात्य कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली होती.
प्रियांकाचे आगामी प्रोजेक्ट्स
प्रियांका चोप्राने आपल्या करिअरची सुरुवात बॉलिवूडमधून केली आणि हळूहळू हॉलिवूडमध्येही प्रवेश केला. आज ती इंटरनॅशनल आयकॉन बनली असून तिच्या चित्रपटांची जगभरात चर्चा होते. पती निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर ही अभिनेत्री परदेशात स्थायिक झाली असेल, पण तिचे मन अजूनही भारतीय आहे. आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ती फरहान अख्तरच्या जी ले जरा या चित्रपटात दिसणार आहे.