प्रियांका चोप्राने एअरपोर्टवर चाहत्यांची माफी का मागितली? नेटकऱ्यांकडून कौतुक
हैदराबादवरून मुंबईत परतल्यावर 19 फेब्रुवारीला प्रियांका चोप्रा तिची लेक मालतीबरोबर लॉस एंजेलिसला तिच्या घरी रवाना झाली. याच दरम्यानचा तिचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका चाहत्यांची माफी का मागत आहे?

देसी गर्ल प्रियांका चोप्रा तिच्या भावाच्या लग्नामुळे बरीच चर्चेत आली आहे. भाऊ सिद्धार्थ चौप्राच्या लग्नातील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. त्यात प्रियांकाने परिधान केलेले डिझायनर कपडे आणि दागिन्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
प्रियांका चोप्राच्या एअरपोर्टवरील व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं
भावाच्या लग्नासोबतच प्रियांका आगामी प्रोजेक्ट्समुळेही भारतात आली होती. सिद्धार्थ चोप्राचं लग्न करून ती चित्रपटांच्या शुटींगासाठी किंवा चित्रपटाच्या कामा संदर्भात हैदराबादला गेली होती. त्यानंतर ती 19 फेब्रुवारीला लेक मालतीबरोबर लॉस एंजेलिसला तिच्या घरी रवाना झाली. याच प्रवासातील प्रियांकाच्या एअरपोर्टवरील व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
चाहत्यांना फोटोसाठी नम्रपणे नाही म्हटलं
प्रियांका चोप्रा आपल्या लाडक्या लेकीला घेऊन लॉस एंजेलिसला रवाना झाली. त्यासाठी ती मुंबई विमानतळावर आली असता तिने मालतीला तिच्या कुशीत घेऊन नेताना दिसलं. तेव्हाच पापाराझीही उपस्थित होते. तर काही चाहत्यांनी तिला पाहाताच फोटो काढण्यासाठी विनंती केली. मात्र, प्रियांकाने तिच्या कुशीत तिची लेक झोपली आहे सांगत चाहत्यांनी फोटोसाठी अगदी नम्रपणे नाही म्हटलं.
View this post on Instagram
प्रियांकाने चाहत्यांची माफीही मागितली
एवढंच नाही तर प्रियांकाने यासाठी चाहत्यांची माफीही मागितली. माफी मागून ती तिथून निघून गेली. प्रियांकाचा हा नम्रपणा पाहून नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी तिचं कौतुक करत ती अतिशय नम्र असल्याच्या कमेंट केल्या आहेत. तर या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी हार्टचे इमोजी पाठवल्या आहेत. तसेच नेटकऱ्यांनी प्रियांकाची लेक मालतीबाबतही कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.
एसएस राजामौलींच्या चित्रपटात प्रियांका साकारणार खलनायिका
दरम्यान प्रियांका प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली आणि महेश बाबू यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी प्रियांका हैदराबादला गेली होती. एसएएस राजामौली यांच्या SSMB29 चित्रपटातून प्रियांका पुन्हा एकदा भारतीय सिनेसृष्टीत कमबॅक करत आहे.
या चित्रपटात प्रियांका महेश बाबूसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे पण माहितीनुसार, प्रियांका राजामौली यांच्या या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे.