Priyanka Chopra : प्रियांका चोप्राचं नाव घेताना होस्टची वळली बोबडी, चुकीच्या नावामुळे चाहते संतापले

एका ब्रिटीश टीव्ही होस्टने प्रियांकाचं नाव चुकीचं घेतलं. आणि ती साधीसुधी चूक नव्हती, त्याने तिचं नाव घेताना मोठ्ठी चूक केली आहे. या होस्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राचं नाव घेताना होस्टची वळली बोबडी, चुकीच्या नावामुळे चाहते संतापले
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 2:31 PM

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचे केवळ भारतातच नव्हे जगभरातही लाखो चाहते आहेत. प्रियांकाने बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही तिच्या कामाचं, अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं असून तिचं सर्वत्र कौतुक होत असतं. सध्या प्रियांका ही बुल्गारी या लग्झरी ब्रांडच्या 140व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न असून तिचा सर्वत्र जलवा दिसत आहे. या ब्रँडची ज्वेलरी घातल्यानंतर प्रियांकाचा लूक अमेझिंग असून सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ व्हायरल झाले, ते पाहून लोकं तिचे कौतुक करताना थकत नाहीयेत. मात्र याच दरम्यान प्रियांकाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालाया ज्यामुळे प्रियांकाचे चाहते खूपच नाराज झाले आहेत.

एका ब्रिटीश टीव्ही होस्टने त्याच्या प्रोग्रॅममध्ये प्रियांका चोप्राचं नाव घेताना चूक केली, त्याने तिचं नाव चुकीच्या पद्धतीने घेतलं. आणि ती काही साधीसुधी चूक नव्हती तर मोठ्ठी चूक होती. त्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पाहून प्रियांका चाहते खूप नाराज झाले आहेत.

प्रियांकाचं नाव घेताना चुकला ब्रिटीश होस्ट

मार्च महिन्यात ब्रिटीश टीव्ही होस्ट अँडी पीटर्स हे त्यांच्या ‘गुड मॉर्निंग ब्रिटन’ या प्रोग्रामसाठी लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये पोहोचले होते. त्या कार्यक्रमादरम्यान अँडी हे त्या म्युझियममधील सर्व सेलिब्रिटींच्या मेण्याच्या पुतळ्याबद्दल बोलत होते. मात्र त्यादरम्यान ते जेव्हा प्रियांका चोप्राच्या पुतळ्याजवळ पोहोचले तेव्हा तिचं नाव घेताना त्यांची बोबडीच वळली आणि त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धीतने नाव उच्चारलं. त्यांनी प्रियांका चोप्राचं नाव “चियांका चॉप फ्री ” असं काहीसं घेतलं. अनेकवळा प्रयत्न करूनही अँडी हे काही प्रियांका चोप्राच्या नावाचा नीट उच्चार करू शकले नाहीत.

त्यावेळी अँडी हे म्युझियममध्ये होते, पण या प्रोग्रॅमदरम्यान स्टू़डिओत बसलेल्या होस्टने त्यांची चूक सुधारण्याचा प्रयत्न केला, त्याला इशारा देऊन समजावलंही. त्यानंतर अँडीची मजा करताना स्टुडिओतील होस्ट म्हणाला ‘ अँडी खरं सांगू का, तुम्ही जर कोणाकडे जात असाल तर आधी त्या व्यक्तीचं नाव काय ते जाणून घ्यावं. ही प्रियांका चोप्रा आहे. भारतीय बॉलिवूड अभिनेत्री, जी अमेरिकेतही खूप मोठी स्टार आहे ‘ असं होस्टने स्पष्ट केलं.

प्रियांकाचे चाहते भडकले

हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून तो पाहून प्रियांका चोप्राचे चाहते मात्र वैतागले आहेत. होस्ट अँडीने पुरेशी तयारी केली नसल्यामुळे आणि चुकीचं नाव घेतल्यामुळे लोक संताप व्यक्त करत आहेत. त्यांनी प्रियांकाचे नाव जाणूनबुजून चुकीचे घेतल्याचा आरोपही करण्यात येत आहे. ‘हा खूप मोठा अनादर आहे, फक्त नाव घेणे चुकीचे नाही, कारण कोणीही चूक करू शकते, परंतु हे जाणूनबुजून केले गेले.’अशी कमेंट एका चाहत्याने केली. तर ‘अँडी पीटर्सला कोणीतरी सांगा की प्रियांका चोप्राने मादाम तुसादमध्ये तिची जागा मिळवली आहे.’ असे लिहीत दुसऱ्या चाहत्याने संताप व्यक्त केला. हा व्हिडीओपाहून एक चाहता तर भलताच भडकला. ‘मला अँडी आवडायचा – पण आता नाही! हे खूप असभ्य होते आणि तिचे नाव घेणे इतके अवघड नाही.’ असंही त्याने म्हटलं.

प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचं झाले तर ती लवकरच ‘हेड ऑफ स्टेट’ या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. यात त्याच्यासोबत इद्रिस एल्बा, जॉन सीना आणि जॅक क्विड सारखे मोठे हॉलिवूड स्टार काम करत आहेत.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....