प्रियांका चोप्राच्या गळ्यात निकच्या नाही तर ‘या’ खास व्यक्तीच्या नावाची चेन; फोटोची सोशल मीडियावर चर्चा
सध्या सोशल मीडियावर प्रियांकाने तिच्या कुटुंबासोबत घालवलेल्या काही सुंदर क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाने गळ्यात घातलेल्या चेनची चर्चा होताना दिसते. तिने निक नाही तर या खास व्यक्तिच्या नावाची चेन घातली आहे.
देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या चित्रपटांपेक्षाही तिच्या खाजगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. ती तिच्या लाइफचे अपडेट चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. प्रियांकाने आताही काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या फोटोंची चर्चा तर होतच आहे पण ती एका वेगळ्या आणि खास कारणाने.
प्रियांका कुटुंबासोबत समुद्रकिनारी
प्रियांकाने नव्या वर्षाच्या दणक्यात स्वागत केलं आहे. प्रियांका चोप्राने तिच्या कुटुंबासोबत समुद्रकिनारी नव्या वर्षाचं स्वागत केलं. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये प्रियांकाचा बिकिनी लूक पाहून नेटकरी फिदा झाले आहेत.बेटावरची ही ट्रिप प्रियांकाची मुलगी मालती मेरीनेही एन्जॉय केल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.
प्रियांकाने त्यांच्या लक्झरी व्हिलाचे फोटो शेअर केलेत. प्रियांकाने बिकिनी वेअर केली आहे. ज्यात ती तिची टोन्ड फिगर फ्लॉंट करताना दिसतेय. दुसऱ्या एका फोटोमध्ये ती लाल बिकिनीमध्ये दिसतेय. तर मालती पाण्यात खेळत दिसतेय. हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंटही केल्या आहेत.
प्रियांकाच्या गळ्यात कोणाच्या नावाची चेन?
पण या फोटोंमुळे प्रियांकाच्या बिकिनी लूकची जेवढी चर्चा नाही झाली तेवढी तिच्या गळ्यातील एका चेनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रियांकाच्या गळ्यात एक वेगळ्या प्रकारची चेन पाहायला मिळत आहे.
या चेनमध्ये एका व्यक्तीच्या नावाच्या स्पेलिंगमधले लेटर्स आहेत. हे नाव निकचं असेल असं अनेकांना वाटणं सहाजिक आहे पण प्रियांकाच्या गळ्यातील चेनमध्ये ज्या नावाचे लेटर्स आहेत ते नाव तिच्या लेकीचं आहे.
View this post on Instagram
म्हणजेच मालती या नावाची चेन प्रियांकाने गळ्यात घातलेली दिसत आहे. ही चेन सध्या आकर्षणाचा विषय बनला आहे. नेटकऱ्यांनी देखील या प्रियांकाने घातलेल्या चेनचं कौतुक केलं आहे.
प्रियांकाने फोटो शेअर करत दिलं खास कॅप्शन
प्रियांकाने फोटो शेअर करत “विपुलता. 2025 साठी माझे ध्येय आहे. आनंदातआणि शांततेत हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभरून मिळो. त्यामुळे माझ्या कुटुंबासाठी कृतज्ञ आहे. 2025 च्या शुभेच्छा.” असं कॅप्शनही दिलं आहे.
निकसोबत प्रियांकाचा खास वेळ
दरम्यान प्रियांका आणि निकने या ट्रिपमध्ये एकमेकांसोबत छान वेळ घालवलेला पाहायला मिळत आहे. जोनास कुटुंबाने समुद्रकिनारी खूप मजा मस्ती केली आणि एकत्र सुंदर फोटोही काढले. तिचा बीच लूक नेटकऱ्यांना खूप आवडला.
प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झाल्यास, ॲक्शन-कॉमेडी हेड्स ऑफ स्टेटमध्ये ती इद्रिस एल्बा आणि जॉन सीना यांच्यासोबत काम करणार आहे. प्रियांका ‘द ब्लफ’मध्ये 19व्या शतकातील कॅरिबियन समुद्री डाकूची भूमिकाही साकारणार आहे.