एका मेसेजमुळे सुरु झाली होती प्रियांका-निकची प्रेमकहाणी; नात्याची सुरुवात फारच हटके, इंट्रेस्टींग लव्हस्टोरी
बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असणारी प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांची प्रेमकहाणी एका मेसेजने सुरू झाली होती. प्रियांका आणि निक फारच इंट्रेस्टींग पद्धतीने भेटले होते.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक सेलिब्रिटींच्या जोडी आहेत ज्या पॉवर कपल म्हणून ओळखल्या जातात. यात काहींनी आपल्यापेक्षा कमी वयाचा जोडीदार निवडला आहे. या जोड्यांची प्रचंड चर्चाही झाली आहे. यातील काही जोडींचे लग्न यशस्वी ठरवले तर, काहींचे घटस्फोट झालेत.
पण यातील एक जोडी अशी आहे की ती बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे. ती म्हणजे देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड सिंगर निक जोनस यांची.
प्रियांका आणि निकची हटके लव्हस्टोरी
प्रियांकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे. तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही लोकांमध्ये चर्चेत असते. प्रियांकाने 2018 साली हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्न केले. 1 डिसेंबर रोजी त्यांच्या नात्याला 6 वर्षे पूर्ण झाली. तर या जोडप्याला सरोगसीच्या माध्यमातून एक मुलगीही आहे. जिचे नाव त्यांनी मालती ठेवले आहे.
प्रियंका आणि निक पहिल्यांदा 2016 मध्ये भेटले होते. मात्र, हे नाते सुरु झाले होते एका मेसेजच्या माध्यमातून. निकने जेव्हा प्रियांकाला पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्याला ती फार आवडली होती. त्याने प्रियांकाच्या एका सहकलाकाराला मेसेज करून प्रियांका खूप सुंदर असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांचे नाते पुढे सुरु ठेवण्यासाठी निकनेच पुढाकार घेतला होता.
एका मेसेजने सुरु झाली प्रेमकहाणी
निकने प्रियांकाला तिच्या सोशल मीडिया आयडीवर मेसेज केला आणि एका वेगळ्यापद्धतीने भेटण्यासाठी विचारले. त्याने मेसेजमध्ये तिला म्हटलं. “आपले काही कॉमन फ्रेंड्स आहेत जे सांगतायत की आपण भेटूया” प्रियांकाने निकच्या मेसेजला उत्तर दिलं आणि नंतर दोघांनी नंबर एक्सचेंज केले.
याचदरम्यान मग त्यांचे हळू हळू बोलणे सुरु झाले. 2017 मध्ये, दोघेही मेट गालाच्या रेड कार्पेटवर पहिल्यांदा कपल म्हणून एकत्र दिसले. तसेच तिसऱ्या डेटसाठी दोघेही ग्रीसला गेले होते जिथे निकने तिला एका गुडघ्यावर प्रपोज केले होते.
2018 मध्ये जोडीने लग्नगाठ बांधली
प्रियांका आणि निकने त्यांचे नाते सार्वजनिक केल्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी दोघांनी लग्नाचा निर्णय घेत लग्नगाठ बांधली. प्रियंका चोप्रा आणि निकने 2018 मध्ये उदयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. ज्यामध्ये दोघांच्या जवळचे लोक सहभागी झाले होते. सध्या हे सर्वांचेच आवडतं कपल आहे.