‘बाई माणूस नसत्या तर 2 लात…’, सर्वेक्षणासाठी आलेल्या BMC कर्मचाऱ्यांवर पुष्कर जोग संतापला

| Updated on: Jan 29, 2024 | 5:16 PM

pushkar jog : सर्वेक्षणासाठी आलेल्या BMC कर्मचाऱ्यांवर पुष्कर जोग संतापला... BMC कडून देखील अभिनेत्यावर कायदेशिर कारवाई करण्याचा इशारा...

बाई माणूस नसत्या तर 2 लात..., सर्वेक्षणासाठी आलेल्या BMC कर्मचाऱ्यांवर पुष्कर जोग संतापला
Follow us on

मुंबई | 29 जानेवारी 2024 : मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सांगायचं झालं तर, राज्यात अनेक ठिकाणी मराठा जातीय सर्वेक्षण करण्याचं काम सुरु आहे. त्यांमुळे महानगरपालिकेचे कर्मचारी या सर्वेक्षणासाठी घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती गोळा करत आहेत. पुष्कर जोग याच्याघरीही बीएमसीमधील महिला कर्मचारी सर्वेक्षणासाठी आल्या होत्या. सर्वेक्षणासाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी अभिनेत्याला जात विचारल्यानंतर पुष्कर याने संताप व्यक्त केला.

सोशल मीडियावर पुष्कर याने एक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘ते जर बाई माणूस नसते तर 2 लात नक्कीच मारल्या असत्या… कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार”’अशी पोस्ट अभिनेत्याने सोशल मीडियावर केली आहे.

अभिनेता पुष्कर जोग पोस्टवर बीएमसीने विरोध करत अभिनेत्यावर कायदेशित कारवाई करण्याची मागणी एका पत्राच्या माध्यमातून केली आहे. ‘महानगरपालिका कर्मचारी हे मराठी सर्वेक्षण करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या ऍपनुसार माहिती विचारत असताना जात विचारल्यामुळे पुरुष कर्मचारी असता तर दोन लाथा घातल्या असत्या असे विधान मराठी सिने कलाकार पुष्कर जोग यांनी केलं. त्यामुळे गांभीर्याने घेतले पाहिजे…’ सध्या सर्वत्र पुष्कर जोग याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

पुष्कर जोग याने अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पुष्कर याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ‘बिग बॉस’ मध्ये देखील अभिनेता झळगला होता. पण आता पुष्कर त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे नाही तर, बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.