बापरे! ‘पुष्पा 2’ च्या तिकीटाची किंमत चक्क 1600 ते 1800 च्या घरात; रिलीजच्या आधीच बुकींग सुरु

रिलीजआधीच "पुष्पा २: द रूल" चित्रपटाचे तिकीट बुकिंग सुरू झाले असून, त्याच्या किमतींनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. मुंबई आणि दिल्लीत तिकिटांच्या किमती 1600 ते 1800 रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत.चित्रपटाच्या प्रचंड क्रेझमुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होणार यात शंकाच नाही.

बापरे! 'पुष्पा 2' च्या तिकीटाची किंमत चक्क 1600 ते 1800 च्या घरात; रिलीजच्या आधीच बुकींग सुरु
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 1:58 PM

‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाची एक वेगळीच क्रेझ सध्या पाहायला मिळतेय. रिलीजआधीच प्रेक्षकांनी तिकीटे बुक करून ठेवली आहेत. चित्रपट रिलीज होण्यासाठी आत काहीच दिवस उरले असताना तिकीटे बुक होण्याची संख्याही वाढत चालली आहे. अशातच आता तिकीटांचे दरही वाढवण्यात आले आहेत. तिकेटे फारच चढ्या किंमतीत विकली जात आहेत.

रिलीजआधीच ‘पुष्पा 2: द रुल’ ची बुकींग सुरु 

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रुल’ 5 डिसेंबरला सिनेमागृहांमध्ये रिलीज होतोय. आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस उरले असून तिकिटांचे काआगाऊ बुकिंग सुरू झाले आहे. रिलीजच्याआधीच चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. कारण प्रेक्षकांनी आधीच तिकेट बुक करून ठेवली आहेत. पण ‘पुष्पा 2’ च्या बुकिंगची एक अनोखी गोष्ट म्हणजे तिची तिकिटे मोठ्या किमतीत विकली जात आहेत. जवळपास 1000 रुपयांच्या घऱात या तिकिटांची किमंत आहे.

तिकिटांचे दर चक्क  1600 ते 1800 च्या घरात 

मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये ‘पुष्पा 2: द रुल’ चे तिकीट दुप्पट किंमतीने विकली जात आहेत. कारण समोर आलेल्या रिपोर्टनुसार दिल्ली एनसीआरमधील थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ च्या तिकिटाची किंमत 1800 रुपयांपर्यंत आहे. तर, मुंबईत चित्रपटाचे तिकीट 1600 रुपयापर्यंत आहे. तसेच बंगळुरूमध्ये सर्वात महागड्या तिकिटासाठी 1000 रुपयांपर्यंत किंमत आहे.

अल्लू अर्जुनचा सर्वात मोठा फॅन्डम मानल्या जाणाऱ्या तेलुगू राज्यांपैकी एक असलेल्या तेलंगणामध्ये सरकारने ‘पुष्पा 2’ साठी विशेष शो असणार आहे. तेलंगणा सरकारने रिलीज तारखेच्या एक दिवस आधी म्हणजेच 4 तारखेपासून ‘पुष्पा 2’ च्या स्पेशल स्क्रीनिंगला परवानगी दिली आहे. तसेच तेलंगणात ‘पुष्पा 2’च्या खास शोसाठी तिकीट दर हा फक्त 800 रुपयांपर्यंत ठेवण्यात येणार आहे.

तेलंगणामध्ये तर चित्रपटाचे स्पेशल शो

तसेच ही किंमत फक्त 4 तारखेच्या खास शोसाठी आहे. त्यानंतर फक्त सामान्य तिकीट दर लागू होतील. रिलीजच्या दिवशी, म्हणजे 5 तारखेला, तेलंगणा सरकारने चित्रपटगृहांना सकाळी 1 आणि पहाटे 4 वाजता दोन अतिरिक्त शो चालवण्याची परवानगी दिली आहे. तेलंगणात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही चित्रपटगृहांना एका निश्चित मर्यादेपर्यंत तिकीट दरात वाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

प्रेक्षकांमध्ये ‘पुष्पा 2’ ची क्रेझ प्रचंड असून या चित्रपटाचे बुकिंग जबरदस्त होत आहे. अशा परिस्थितीत तिकिटांच्या वाढलेल्या किंमती चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढवण्यास नक्कीच फायद्याचं ठरणार आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.