Rashmika Mandanna | ‘पुष्पा 2’ पूर्वी रश्मिका मंदानाला मिळाली मोठी ऑफर, या सुपरस्टारसह करणार काम

अल्लू अर्जुनच्या पुष्पामध्ये श्रीवल्लीची भूमिका साकारून रश्मिका मंदाना खूप लोकप्रिय झाली होती. अनेक लोक तिच्या पुष्पा 2 ची वाट पाहत आहेत. मात्र रश्मिका सध्या वेगळ्याच न्यूजमुळे चर्चेत आहे.

Rashmika Mandanna | 'पुष्पा 2' पूर्वी रश्मिका मंदानाला मिळाली मोठी ऑफर, या सुपरस्टारसह करणार काम
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 3:51 PM

मुंबई | 14 ऑगस्ट 2023  : 2021 सालच्या अखेरीस साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटाला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धमाका केला होता. या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या अपोझिट रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) होती. तिची श्रीवल्लीची भूमिका लोकांना प्रचंड आवडली होती. गेल्या अनेक काळापासून लोकं पुष्पा 2 बद्दल चर्चा करत असून चाहते त्या चित्रपटाची वाट बघत आहेत. याचदरम्यान रश्मिकाला एक दुसरा, मोठा चित्रपट मिळाल्याची चर्चा आहे.

रश्मिका मंदाना हिला साऊथचा सुपरस्टार धनुषसोबत चित्रपट मिळाला आहे, अशी चर्चा आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही, परंतु सध्या या चित्रपटाचे नाव D51 असे आहे. शेखर कमुल्ला या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये झळकणार असल्याचे समजते. रश्मिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर यासंदर्भातील एक व्हिडिओही शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये रश्मिका नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत असून चाहत्यांसाठी आपल्याकडे एक सरप्राईज असल्याचे ती सांगत आहे. यामध्ये तिने D51 चे पोस्टर असलेली एक फोटो फ्रेम दाखवली. त्यानंतर ‘या चित्रपटात (रश्मिकाचे) स्वागत आहे’ अशी रश्मिकाची फ्रेमही दिसते. नव्या प्रवासाची सुरूवात#D51, असे रश्मिकाने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे. त्यासह तिने शेखर कमुल्ला, धनुष यांच्यासह चित्रपटाशी संबंधित इतर लोकांनाही टॅग केले आहे.

या चित्रपटाचं खरं नाव काय, तो कधी रिलीज होईल, वगैरे यैबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेल नाही. मात्र या चित्रपटाद्वारे धनुष आणि रश्मिका पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

पुष्पा 2 बद्दल बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी एक टीझर व्हिडिओ जारी करून निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.