मुंबई : परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा अत्यंत शाही पद्धतीने दिल्ली येथे 13 मे रोजी पार पडलाय. विशेष म्हणजे या साखरपुड्याला अत्यंत खास लोक उपस्थित होते. साखरपुड्यामध्ये परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हिने राघव चड्ढा याच्यासाठी खास गाणे देखील म्हटले. प्रियांका चोप्रा ही देखील आपल्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी पोहचली होती. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळाले.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाली. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे नेहमीच मुंबईमध्ये स्पाॅट होताना दिसले आहेत. मात्र, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी कधीच आपल्या नात्याबद्दल जाहिरपणे भाष्य केले नाही.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची चाहते आता आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे राजस्थानमध्ये 25 सप्टेंबरला लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. अत्यंत जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
लग्नाच्या अगोदर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे मंदिरांमध्ये दर्शनाला जाताना दिसत आहेत. नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे उज्जैन तेथील मंदिरात दर्शनासाठी पोहचले होते. लग्नाच्या अगोदर बाबा महाकालचे आर्शिवाद घेण्यासाठी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा पोहचले. आता मंदिरामधील परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
यावेळी परिणीती चोप्रा हिने साडी घातली होती आणि राघव याने लाल शॉल घेतली होती. नंदी गृहपर्यंत भाविकांना पारंपारिक वेशभूषा घालणे बंधनकार आहे आणि त्याच नियमाचे पालन हे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्याकडून करण्यात आले. बाबा महाकालची पूजा आणि आरती करून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी आर्शिवाद घेतले.