अभिनेता राहुल रॉय यांना कारगिलमध्ये शुटिंगवेळी ब्रेन स्ट्रोकचा झटका

कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज आहे. | Actor Rahul Roy

अभिनेता राहुल रॉय यांना कारगिलमध्ये शुटिंगवेळी ब्रेन स्ट्रोकचा झटका
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 8:48 PM

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राहुल रॉय (Actor Rahul Roy) यांना कारगिलमध्ये चित्रीकरण सुरु असताना मेंदूघाताचा (brain stroke) झटका आल्याची माहिती समोर आली आहे. ते कारगिलमध्ये एलएसी- लिव्ह द बॅटल ( LAC – Live the Battle) या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. (Rahul Roy suffers brain stroke admitted to Mumbai’s Nanavati hospital )

राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. राहुल रॉय यांचे बंधू रुमर सेन यांची या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राहुल रॉय यांची प्रकृती आता सुधरत असल्याचेही त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.

कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज आहे. प्रकृती बिघडल्यानंतर राहुल रॉय यांना प्रथम कारगिलहून श्रीनगरला आणि त्यानंतर मुंबई आणण्यात आले.

राहुल रॉय यांनी ‘आशिकी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टी पदार्पण केले होते. नव्वदीच्या दशकात या चित्रपटाने लोकप्रियतेचे नवे मापदंड रचले होते. सध्या राहुल रॉय कारगिलमध्ये LAC – Live the Battle या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. यामध्ये ते एका मेजरची व्यक्तिरेखा साकारत आहेत.

नितीन कुमार गुप्ता LAC – Live the Battle या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. तर चित्रा वकील शर्मा आणि निवेदिता बसू या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.

या चित्रपटामुळे राहुल रॉय लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. ‘आशिकी’ चित्रपटानंतर राहुल रॉय यांनी तब्बल ४७ चित्रपट साईन केले. मात्र, त्यानंतर राहुल रॉय हिंदी चित्रपटसृष्टीपासून दुरावले. मध्यंतरी ते छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. ते ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वाचे विजेते ठरले होते. त्यानंतर ते पुन्हा लाईमलाईटपासून दूर गेले होते.

इतर बातम्या:

kangana ranaut | संगीतकार वाजिदच्या निधनानंतर पत्नीचे सासरवर गंभीर आरोप, कंगनाचा पंतप्रधानांना प्रश्न

Rajnikanth | सुपरस्टार रजनीकांत तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत

विद्या बालनचा डिनरला नकार, रागातून मंत्र्याकडून शूटिंगला आडकाठी, सोशल मीडियावर चर्चा

(Rahul Roy suffers brain stroke admitted to Mumbai’s Nanavati hospital )

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.