Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Roy | राहुल रॉयच्या तब्येतीत सुधार, मात्र उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात, दिग्दर्शक मित्राकडून आर्थिक मदतीचे आवाहन!

कारगिलमध्ये त्यांच्या आगामी ‘एलएएसी : लिव्ह द बॅटल’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना राहुल यांना ब्रेन स्ट्रोक आला होता.

Rahul Roy | राहुल रॉयच्या तब्येतीत सुधार, मात्र उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात, दिग्दर्शक मित्राकडून आर्थिक मदतीचे आवाहन!
अभिनेता राहुल रॉय यांना 'एल.ए.सी - लाइव्ह द बॅटल' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ब्रेन स्ट्रोक झाला. या चित्रपटाचं चित्रीकरण कारगिलमध्ये सुरु होतं. आता सध्या त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 6:07 PM

मुंबई : ‘आशिकी’ फेम अभिनेता राहुल रॉय (Rahul Roy) यांची तब्येत सध्या सुधारत आहे. अलीकडेच ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कारगिलमध्ये त्यांच्या आगामी ‘एलएएसी : लिव्ह द बॅटल’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना राहुल यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. राहुल रॉय यांचे जवळचे मित्र आणि डॉक्टर नितीनकुमार गुप्ता (Nitin Kumar Gupta) यांनी राहुल यांच्या तब्येतीची माहिती दिली. ‘राहुल रॉयच्या प्रकृतीत खूपच सुधारणा आहे आणि काही दिवसांतच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल’, असे ते म्हणाले. यावेळी राहुल यांच्या आर्थिक परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले (Rahul Roy’s Friend Director Nitin Kumar Gupta Asks for financial Help).

काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये अशा काही बातम्या समोर येत होत्या, ज्यात राहुल रॉय बेशुद्ध आहे आणि आर्थिक संकटात आहे, असे सांगण्यात आले होते. रुग्णालयाच्या खर्चासाठी त्याला आर्थिक मदत हवी होती, असेही सांगण्यात येत होते. यासंदर्भातही नितीन यांनी एक निवेदन दिले आहे. त्यांनी या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. नितीन म्हणाले की, ते वैद्यकीय टीम आणि राहुलचा भाऊ रोहित यांच्या संपर्कात आहेत. त्यांची स्पीच थेरपी आणि फिजिओथेरपी चांगली सुरू आहे. राहुलने रोहितशीही काही सेकंद संवाद साधला.

इच्छा असल्यास मदत करा…

नितीन यांनी हेही सांगितले की, ते सध्या राहुलचे सर्व खर्च पाहत आहेत. कारण राहुल त्यांचे खाते हाताळण्याच्या स्थितीत नाहीत. डॉक्टरांनी गरज पडल्यास राहुल यांना स्टेंट बसवावा लागू शकतो आणि त्यासाठी जास्त खर्च येवू शकतो, असे सांगितले आहे.

राहुलच्या उपचारांचा खर्च लाखोंपर्यंत जाऊ शकतो. नितीन म्हणाले की, ‘मी आत्ताचा सर्व खर्च पहात आहे. पण, इतर कोणालाही यात मदत करायची असेल तर ते करू शकतात. राहुल बरा झाल्यावर प्रत्येकाचे पैसे परत देईल.’ राहुल यांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांना आयसीयूमधून बाहेर आणण्यात आले आहे (Rahul Roy’s Friend Director Nitin Kumar Gupta Asks for financial Help).

चित्रीकरणादरम्यान ब्रेनस्ट्रोक

कारगिलमध्ये चित्रीकरण सुरु असताना मेंदूघाताचा झटका अर्थात ब्रेनस्ट्रोक आल्याची माहिती समोर आली होती. ते कारगिलमध्ये ‘एलएसी- लिव्ह द बॅटल’ (LAC – Live the Battle) या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्यानंतर राहुल रॉय यांना प्रथम कारगिलहून श्रीनगरला आणि त्यानंतर मुंबई आणण्यात आले.

राहुल रॉय यांनी ‘आशिकी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टी पदार्पण केले होते. नव्वदीच्या दशकात या चित्रपटाने लोकप्रियतेचे नवे मापदंड रचले होते. सध्या राहुल रॉय कारगिलमध्ये LAC – Live the Battle या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. यामध्ये ते एका मेजरची व्यक्तिरेखा साकारत आहेत. नितीन कुमार गुप्ता LAC – Live the Battle या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. तर चित्रा वकील शर्मा आणि निवेदिता बसू या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.

(Rahul Roy’s Friend Director Nitin Kumar Gupta Asks for financial Help)

कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.