Jailer | रजनीकांत यांचा ‘जेलर’ तोडणार पठाणचा रेकॉर्ड ? बॉक्स ऑफीसवर करणार तगडी कमाई ?
सुपरस्टार रजनीकांत यांची पॅन इंडिया फिल्म 'जेलर' आज रिलीज झाली आहे. या चित्रपटाला भारताव्यतिरिक्त, अमेरिका, युरोप आणि दुबईतही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Jailer Box Office Prediction : साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajanikant) यांच्याबद्दल चाहत्यांना प्रचंड वेड आहे. सुमारे दोन वर्षांनंतर ‘थलायवा’ यांचे पुनरागमन होत असल्याने चाहते खूपच खुश आहेत. आज रजनीकांत आणि तमन्ना भाटिया यांचा ‘जेलर’ (Jailer release) हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे शानदार ॲडव्हान्स बूकिंग (advance booking) पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डतोड कमाई करेल असा अंदाज व्यक्त होत आहे. चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगद्वारेच 35 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
रजनीकांत यांचे चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नसतात. रजनीकांत आणि तमन्ना भाटिया यांच्या ‘जेलर’ला दक्षिणेपासून ते परदेशापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत जेलरला बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, पहिल्या दिवशी फक्त तामिळनाडीमध्ये जेलरचे 20 कोटींचे ओपनिंग होऊ शकते.
‘जेलर’ चे ओपनिंग डे कलेक्शन
तसेच ग्लोबल कलेक्शन बद्दल बोलायचे झाले तर रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट जगभरात 70 ते 80 कोटींची शानदार कमाई करू शकतो. ॲडव्हान्स बूकिंगद्वारे या चित्रपटाने भारतात सुमारे 20 कोटी रुपयांची कमाई केली असून ग्लोबल कलेक्शन 35 कोटींहून अधिक झाल्याचे समजते.
‘पठाण’चा रेकॉर्ड मोडणार का ?
रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटाची साऊनमध्ये जबरदस्त क्रेझ आहे.मात्र कमाईच्या बाबतीच हा चित्रपट शाहरूख खानच्या पठाणला मागे टाकू शकेल का ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पठाण हा या वर्षातील भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. शाहरुख खानच्या पठाणने पहिल्या दिवशी जगभरात 106 कोटींची बंपर कमाई केली होती. केवळ भारतातच पठाणने 53 कोटी कमावले होते.
2 वर्षांनी रजनीकांत यांचे पुनरागमन
जेलर चित्रपटासह सुपरस्टार रजनीकांत हे दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. या चित्रपटात 72 वर्षांचे रजनीकांत हे 33 वर्षांच्या तमन्ना भाटियासह दिसणार आहेत. याशिवाय चित्रपटात जॅकी श्रॉफ, राम्या कृष्णन, योगी बाबू आणि विनायक यांचीही भूमिका असेल. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल आणि कन्नड स्टार शिवा राजकुमार यांनी चित्रपटात कॅमिओ केला आहे.