मुंबईतील ‘त्या’ बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन सुपरस्टार्सचे आयुष्य, कुठे आहे हा बंगला?
मुंबईत एक बंगला असा होता ज्या बंगल्यात रहायला गेलेल्या सुपरस्टारचे सुपर्ण आयुष्य बदलले होते. यशाच्या शिखरावर असलेले हे अभिनेते अचानक फ्लॉप ठरू लागले होते. हा बंगला कुठे आहे जाणून घ्या...

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या चित्रपटांसोबतच लग्झरी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. खासकरून कलाकारांची घरे पाहण्यासाठी सर्वजण आतुर असतात. कधीकधी कलाकार हे सतत घर बदलताना दिसतात. त्यामागे वेगवेगळी कारणे असतात. पण बॉलिवूडमधील तीन सुपरस्टार्स असे आहेत ज्यांनी खरेदी केलेल्या बंगल्यामुळे त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली असे म्हटले जात होते. आता हा बंगला नेमका कुठे आणि कोणत्या कलाकाराने खरेदी केला होता? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मुंबईतील वांद्रे परिसरात एक असा एक बंगला होता जिथे भारत भूषण, राजेंद्र कुमार आणि राजेश खन्ना हे तीन सुपरस्टार राहत होते. या घरात राहात असताना त्यांना करिअरमध्ये प्रचंड यश मिळाले आणि याच घरात राहात असताना त्यांच्या स्टारडमचा अंत देखील झाला. दक्षिण मुंबईतील कार्टर रोडवर हा बंगला आहे, ज्यामध्ये 3 स्टार्स राहत होते आणि त्या प्रत्येकाबद्दल वेगवेगळ्या चर्चा आहेत. या तिन्ही स्टार्सनी आपापल्या काळात खूप यश मिळवले होते. पण या घरात राहायला गेल्यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले.
वांद्रेमधील या बंगल्याची जेव्हा विक्री होत असे तेव्हा तेव्हा तेथे राहणारे मालक आपल्या आवडीनुसार बंगल्याचे नाव देत असे. जसे राजेंद्र कुमार यांनी त्यांच्या मुलीचे नाव डिंपल असे या बंगल्याला दिले होते. त्याचप्रमाणे राजेश खन्ना यांनी या बंगल्याचे नाव आशीर्वाद ठेवले. नंतर राजेश खन्ना यांचा हा बंगला एका व्यावसायिकाने विकत घेतला. या व्यावसायिकाने देखील या बंगल्याचे नाव बदलले होते.




भारत भूषण यांनी सर्वप्रथम खरेदी केला होता बंगला
४० आणि ५० च्या दशकात भारत भूषण यांचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट होते. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, भारत भूषण यांनी समुद्र किनाऱ्याजवळ असलेला एक बंगला खरेदी केला होता. या बंगल्यात राहायला आल्यानंतर या अभिनेत्याने ‘बैजू बावरा’, ‘मिर्झा गालिब’, ‘गेटवे ऑफ इंडिया’ आणि ‘बरसात की रात’ सारखे हिट चित्रपट दिले. काही वर्षांनी त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी हा बंगला विकला.
राजेंद्र कुमार यांनी खेरदी केला हा बंगला
‘मदर इंडिया’ (1957) आणि ‘धूल के फूल’ (1959) सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर राजेंद्र कुमार यांनी निर्मात्यांकडून सिनेमाची फी न घेता हा बंगला घेतल्याचे म्हटले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजेंद्र कुमार यांनी हाच बंगला भूषण कुमार यांच्याकडून घेतला होता. त्याकाळात हा बंगला एक अड्डा असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर राजेंद्र कुमार यांनी या बंगल्यात पूजा केली आणि त्याचे नाव ‘डिंपल’ ठेवले. या घरात आल्यानंतर राजेंद्र कुमार यांनी अनेक हिट चित्रपट दिले, पण त्यांची कारकीर्दही डबघाईला आली आणि त्यांनी आपल्या मुलासाठी अनेक चित्रपट तयार केले जे अयशस्वी ठरले. आर्थिक संकटामुळे त्यांना हा बंगला विकावा लागला.
राजेश खन्ना यांनी आशीर्वाद घेतले
राजेश खन्ना यांनी 1967 मध्ये आखरी खत या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडण्यास सुरुवात केली होती. त्याच वेळी राजेंद्र कुमार आपला बंगला विकत असल्याचे राजेश खन्ना यांना कळाले. तेव्हा त्यांनी तो विकत घेतला. तसेच त्यांनी त्याचे नाव ‘आशीर्वाद’ असे ठेवले. या बंगल्यात आल्यानंतर जवळपास 5 वर्षांनी राजेश खन्ना यांचे स्टारडम हळूहळू कमी होऊ लागले होते. 80 च्या दशकाच्या अखेरीस राजेश खन्ना यांचे स्टारडमही संपुष्टात आले. 2014 मध्ये राजेश खन्ना यांचा बंगला मुंबईतील एका उद्योगपती शशी करण शेट्टीने विकत घेतला. त्यावर त्याने बिल्डींग उभी केली.