Happy Birthday Rajinikanth : रजनीकांत यांचे प्रदर्शित न झालेले हिंदी चित्रपट कोणते? एका चित्रपटात तर होती श्रीदेवी

सुपरस्टार रजनीकांत यांच्याबद्दल माहिती नाही असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. रजीनाकांत यांचे सिनेमे आणि त्यांच्या स्टाईलने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक महागडा अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आज त्यांचा 74 वा वाढदिवस आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या रिलीज न झालेल्या सिनेमाचा घेतलेला हा आढावा.

Happy Birthday Rajinikanth : रजनीकांत यांचे प्रदर्शित न झालेले हिंदी चित्रपट कोणते? एका चित्रपटात तर होती श्रीदेवी
रजनीकांत
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 5:02 PM

सुपरस्टार अभिनेते, थलाइवा रजनीकांत यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. मूळ मराठी असलेल्या रजनाकांत यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येही रजनीकांत यांचा बोलबाला आहे. सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते म्हणून त्यांची ख्याती आहे. तमिळ सिनेमांप्रमाणेच हिंदी चित्रपटांमध्येही त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. रजनीकांत यांनी गोविंदा, अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. त्यांचे अनेक हिंदी चित्रपट आहेत. पण बरेच हिंदी चित्रपट प्रदर्शितही झालेले नाहीत. त्यामागे काही महत्त्वाची कारणं होती. रजनीकांत यांचे कोणते हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत, यावर टाकलेला हा प्रकाश.

तू ही मेरी जिंदगी (1990)

या चित्रपटात शम्मी कपूर, विनोद खन्ना, ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांसारखे मोठे कलाकार होते. रजनीकांत देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते, परंतु काही कारणांमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

टकराव (1986)

रजनीकांत, शत्रुघ्न सिन्हा, अनिता राज, अमरीश पुरी, प्रेम चोपड़ा आणि सुषमा सेठ यांची भूमिका असलेला टकराव कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यातील काही वादामुळे हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही.

शिनाख्त (1988)

रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, सुजाता मेहता आणि परेश रावल यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबतचा रजनीकांत यांचा हा सिनेमाही प्रदर्शित झाला नाही. हा चित्रपट “गंगा जमुना सरस्वती” सारखा दिसत होता आणि त्यामुळे तो कधीच प्रदर्शित झाला नाही.

घर का भेदी (1990)

रजनीकांत, अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटालाही रिलीज होण्याचा मुहूर्त सापडला नाही. या चित्रपटाची शुटिंग अर्ध्यावरच बंद पडल्याचं सांगितलं जातं.

रस्ते पथर का (1984)

या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती बी. सुभाष यांनी केली होती. चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण झाले होते. परंतु काही कारणांमुळे तो चित्रपट पूर्णपणे बंद झाला आणि प्रदर्शित होऊ शकला नाही.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.