जया बच्चन यांनी नीट ऐकले नाही, किंवा त्यांना समजले नाही, राजू श्रीवास्तवांकडून रवी किशनची पाठराखण

मी रवी किशन यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. जया बच्चन यांनी रवी किशन यांचे म्हणणे एक तर नीट ऐकले नाही, किंवा त्या समजू शकलेल्या नाहीत, असे राजू श्रीवास्तव यांनी इन्स्टाग्राम व्हिडीओत म्हटले आहे.

जया बच्चन यांनी नीट ऐकले नाही, किंवा त्यांना समजले नाही, राजू श्रीवास्तवांकडून रवी किशनची पाठराखण
Follow us
| Updated on: Sep 16, 2020 | 9:25 AM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्यानंतर बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत. सोनम कपूर, फरहान अख्तर यासारख्या तरुण फळीने जया यांची बाजू घेतली आहे, तर विनोदवीर राजू श्रीवास्तव यांनी रवी किशन यांची पाठराखण करत जया यांनी नीट ऐकले नाही किंवा त्यांना समजले नाही, असा दावा केला आहे. (Raju Srivastava supports Ravi Kishan saying Jaya Bachchan did not understand his view)

“बॉलिवूडमधून ड्रग्ज माफियांची सफाई करणे, हीच अभिनेता सुशांतसिंह राजपूतला खरी श्रद्धांजली ठरेल. मी सरकारला विनंती करतो, की कठोर कायदे करावेत, गुन्हेगारांना अशी शिक्षा द्यावी, की पुन्हा ते याचा विचारही करणार नाहीत. ड्रग्ज आणि नशेमुळे युवा पिढी बरबाद झाली आहे. माझे असे म्हणणे आहे, की हे फक्त बॉलिवूडच नाही, तर दुसऱ्या क्षेत्रातही आहे. मात्र बॉलिवूड कलाकारांचा युवकांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव असतो. युवक त्यांचे हेअरस्टाईल, फॅशन कॉपी करतात” असे राजू श्रीवास्तव यांनी इन्स्टाग्राम व्हिडीओत म्हटले आहे.

“ड्रग्ज नेपाळच्या मार्गाने येत असोत किंवा पंजाब… सरकारने काटेकोरपणे सर्व सीमा सील केल्या पाहिजेत. मी रवी किशन यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. जया बच्चन यांनी रवी किशन यांचे म्हणणे एक तर नीट ऐकले नाही, किंवा त्या समजू शकलेल्या नाहीत. त्यामुळे आपली युवा पिढी बरबाद होऊ नये, यासाठी कितीही मोठे ड्रग्ज माफिया असले, तरी ते गजाआड झालेच पाहिजेत” अशी मागणी राजू श्रीवास्तव यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

चित्रपटसृष्टीतील अंमली पदार्थांच्या वापराचा मुद्दा खासदार रवी किशन यांनी सोमवारी लोकसभेत उपस्थित केला होता. त्याला राज्यसभेच्या शून्य प्रहरात उत्तर देताना मंगळवारी जया बच्चन म्हणाल्या की ‘सरकारने मनोरंजन विश्वाच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे, कारण मनोरंजन विश्वच नेहमी सरकारच्या मदतीला येते. एखादी राष्ट्रीय आपत्ती आल्यास ते पुढे येतात, पैसे देतात, सेवा बजावतात. काही जणांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा मलीन करणे चुकीचे आहे”

“मनोरंजन विश्वामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव आणि ओळख मिळते, पण मनोरंजन विश्वाचा भाग असलेल्या लोकसभा खासदाराने फिल्म इंडस्ट्रीविरोधात भाष्य केले. याची मला अत्यंत लाज वाटली. ज्या ताटात खाता, त्यातच भोक पाडता. आम्हाला संरक्षण आणि सरकारचा पाठिंबा हवा” अशी मागणी जया बच्चन यांनी केली. (Raju Srivastava supports Ravi Kishan saying Jaya Bachchan did not understand his view)

दरम्यान, जयाजींनी माझ्या बोलण्याला पाठिंबा द्यावा अशी माझी अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रवी किशन यांनी दिली. “मनोरंजन विश्वातील प्रत्येक जण ड्रग्ज घेत नाहीत, परंतु जे घेतात ते जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग संपवण्याच्या योजनेचा एक भाग आहेत. जयाजी आणि मी जेव्हा इंडस्ट्रीत आलो, तेव्हा परिस्थिती अशी नव्हती. पण आता आपल्याला तिचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे” असेही ते म्हणाले.

रवी किशन काय म्हणाले होते ?

रवी किशन यांनी लोकसभेत सोमवारी ड्रग्ज संदर्भात भाष्य केलं होतं. बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं वाढतं प्रमाण याबाबत रवी किशन यांनी चिंता व्यक्त केली. सरकारने ड्रग्जचं सेवन करणाऱ्या आणि त्याची तस्करी करणाऱ्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करताना रवी किशन यांनी एनसीबीचं कौतुकही केलं. “भारतीय सिने जगतात ड्रग्ज घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. या प्रकरणी काही जणांना अटकही केली आहे. एनसीबीही चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडत आहे” या शब्दात रवी किशन यांनी एनसीबीचं कौतुक केलं होतं.

कंगनाचे जहरी ट्वीट

“जयाजी, जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेतासोबत किशोरवयात मारहाण, ड्रग्ज देणे आणि विनयभंग झाला असता तर तुम्हीही असेच म्हणाला असतात का? अभिषेकने सतत गुंडगिरी आणि छळवणूक झाल्याबद्दल तक्रार केली असती, आणि एक दिवस तो लटकलेल्या अवस्थेत आढळला असता, तर आपण असेच बोलला असता काय?” असा सवाल अभिनेत्री कंगना रनौत हिने जुही सिंहचा व्हिडीओ शेअर करत विचारला.

संबंधित बातम्या :

जया बच्चन यांचा भाजप खासदार रवी किशनवर अप्रत्यक्ष निशाणा, अभिषेकचे नाव घेत कंगनाचे जहरी ट्वीट

(Raju Srivastava supports Ravi Kishan saying Jaya Bachchan did not understand his view)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.