Rakhi Sawant : स्मशानभूमीतून आईच्या अस्थीही घेतल्या नाही, राखीचे रडून रडून डोळे सुजले; भारतात येण्याची तडफड
अनेक दिवसांपासून गायब असलेली ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ती धायमोकलून रडत आहे. तिला भारतात यायचं आहे. त्यासाठी ती रडत आहे. तिने भारतातील राजकारण्यांना मदत करण्याचं आवाहनही केलं आहे.
ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या गेल्या काही काळापासून लाईमलाईटपासून दूर आहे. मात्र, या ड्रामा क्वीनचा सोशल मीडियावर अचानक एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राखी प्रचंड रडताना दिसत आहे. रडून रडून तिचे डोळे सूजले आहेत. भारतात येण्यासाठी तिची तगमग सुरू आहे. त्यासाठी तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साकडे घातले आहे. आपल्या आईच्या अस्थी सुद्धा स्मशानभूमीतून घेऊ न शकल्याची वेदना तिने व्यक्त केली आहे.
राखी सावंत बऱ्याच काळापासून दुबईत अडकली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याता ती रडत आहे. तिच्या वेदना सांगत आहे. आणि मदतीची हाकही मागत आहे. पीएम मोदीजी, भाजप आणि देशातील जेवढेही कायद्याचे संरक्षक आहेत. त्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, मला भारतात आणण्यासाठी मदत करा. मला आपल्या देशात यायचं आहे. माझी बेल झाली तर मला देशात परतता येणार आहे, असं राखीने म्हटलं आहे.
स्मशानभूमीतून फोन येतोय
मी माझ्या आईच्या अस्थी सुद्धा स्मशानभूमीतून घेतल्या नाहीत, असं तिने म्हटलंय. मी निर्दोष आहे. माझ्यासोबत अत्यंत चुकीची गोष्ट होत आहे. गेल्या दोन वर्षापासून मी दुसऱ्या देशात राहत आहे. आता मला या देशात अधिक काळ राहायचं नाहीये. मला स्मशानभूमीतून फोन येतोय. पण तिकडे जाऊ शकत नाही. मला तुरुंगात डांबण्याची धमकी दिली जात आहे. मला जामीनही मिळणार नाही, अशी धमकी दिली जात आहे, असा दावा तिने केलाय.
काय आहे प्रकरण?
राखी सावंतचं हे सर्व प्रकरण तिचा आधीचा नवरा आदिल दुर्रानी यांच्याशी संबंधित आहे. काही दिवसांपूर्वी राखीने दुबईत एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. मात्र, आदिलने तिच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. त्याचबरोबर राखीच्या विरोधात खटलाही भरला होता. तेव्हापासून राखी दुबईत आहे. भीतीपोटी ती भारतात येत नाहीये. आता तिने एक व्हिडीओ शेअर करून या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी राजकीय नेत्यांना विनवण्या केल्या आहेत.