भारत की दुबई, कुठे येणार राखी सावंतच्या लग्नाची वरात? होणारा नवरा पाकिस्तानचा पोलीस ऑफिसर
राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती पाकिस्तानी व्यक्ती डोडी खानसोबत लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. राखीने स्वतः याबद्दल सांगितलं असून ती सध्या लाहोरमध्ये असल्याचं तिने सांगितले आहे. दरम्यान राखीच्या लग्नाची वरात कुठे आणायची भारतात की दुबईत असा प्रश्न होणाऱ्या नवऱ्याने विचारला आहे.
![भारत की दुबई, कुठे येणार राखी सावंतच्या लग्नाची वरात? होणारा नवरा पाकिस्तानचा पोलीस ऑफिसर भारत की दुबई, कुठे येणार राखी सावंतच्या लग्नाची वरात? होणारा नवरा पाकिस्तानचा पोलीस ऑफिसर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Untitled-193.jpg?w=1280)
ड्रामा क्वीन, एंटरटेंमेंट म्हटलं की अर्थातच एकाच व्यक्तिचं नाव येत ती म्हणजे राखी सावंत. बॉलिवूड असो, रिअॅलिटी शो असो किंवा मराठी-हिंदी बिगबॉस असो राखी सावंत त्याचा एक भाग असतेच असते. राखी सावंत म्हटलं की कॉन्ट्रोवर्सी असणारचं. मग तिच्या फिल्मबद्दल असो किंवा तिच्या पर्सनल लाइफबद्दल असो.
राखी सावंत तिसऱ्यांदा करतेय लग्न
राखी सावंतच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होतच असते. तिच्या अफेअर्सबद्दल, तिच्या लग्नाबद्दल नेहमीच काहीना काही घडत असतं. आताही राखी सावंत अशाच एका बातमीमुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरतेय. ती बातमी म्हणजे राखी सावंत पाकिस्तानच्या एका व्यक्तीशी लग्न करणार असल्याची. याबद्दल स्वत: राखीने खुलासा केला आहे.
राखी सावंतने पाकिस्तानची सून बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तिच्या याआधीच्या अनेक व्हिडिओंमध्ये राखीने पाकिस्तानात जाऊन तिथे काम करण्याबाबतही सांगितले आहे. दरम्यान, पाकिस्तानी अभिनेता डोडी खाननेही राखी सावंतला लग्नाची मागणी घातल्याचं तिने सांगितलं आहे. मात्र दोन घटस्फोटानंतर आता राखी तिसरं लग्न करणार आहे. राखी आता या मुद्द्यावर स्पष्टपणेच बोलली आहे.
पाकिस्तानची सून होण्याची इच्छा
राखी सावंतने एका मुलाखतीत तिच्या तिसऱ्या लग्नाच्या बातमीवर चर्चा केली. राखी सावंतने सांगितले की, ती सध्या पाकिस्तानच्या लाहोरमध्ये आहे. ती म्हणाली की ती डोडी खानच्या लग्नाच्या प्रस्तावावर विचार करेल आणि पाकिस्तानची सून होण्याचा विचार करेल.
राखी सावंत म्हणाली, “हो, हे अगदी बरोबर आहे. मी पाकिस्तान लाहोरला आले आहे. जेव्हा पाकिस्तानातील लोकांनी पाहिले की मी तिथे पोहोचले आहे, तेव्हा डोडी जी माझे खूप दिवसांपासूनचे मित्र आहेत, म्हणून त्यांनी मला लग्नाचा प्रस्ताव दिला, मला त्यांचा प्रस्ताव खूप आवडला. सध्या मी लग्नाचा विचार करत आहे, मी पाकिस्तानची सून होण्याचा विचार करत आहे.” असं राखीने स्पष्टच सांगितले आहे.
लग्नाची वरात कुठे येणार भारतात की दुबईत?
राखी सावंतच्या वक्तव्यावर डोडीनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने राखीला विचारले, “ लग्नाची वरात कुठे घेऊन यायची आहे भारतात की दुबईला?” वास्तविक, राखी सावंतने तिच्या व्हिडिओंमध्ये हानिया आमिरच्या नावाचा वारंवार उल्लेख केल्याने हे प्रकरण सुरू झाले. राखीने व्हिडिओ शेअर करत म्हटलं, हानिया, मी पाकिस्तानात येत आहे, तू मला घेण्यासाठी विमानतळावर ये. हानियाने व्हिडीओ शेअर करत राखी जी मी एअरपोर्टवर येत असल्याचे सांगितलं.
View this post on Instagram
यानंतर राखीचा एक ऑडिओ मेसेजही समोर आला, ज्यामध्ये तिने पाकिस्तानमध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. एवढच नाही तर पाकिस्तानात लग्न केल्यानंतर भारतात रिसेप्शन देईल तसेच स्वित्झर्लंडला आणि नेदरलँडमध्ये हनिमून साजरा करेल आणि नंतर पतीसोबत दुबईत स्थायिक होणार असल्याचंही तिने सांगितलं आहे.
कोण आहे डोडी खान?
डोडी खान पाकिस्तानी अभिनेता आणि मॉडेल आहेत. तर रिपोर्टनुसार ते पाकिस्तानात पोलीस अधिकारी देखील आहेत. तसेच त्यांची पाकिस्तानात प्रचंड लोकप्रियता आहे, डोडी यांनी पाकिस्तानात दुर्ज, घबराना नहीं है, आखाडा आणि चौधरी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. ते बॉलिवूड स्टार संजय दत्तला आपला आदर्श मानतात. त्यामुळे आता राखीच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा ही खरी आहे की फक्त एक कॉन्ट्रोवर्सी हे लवकरच समजेल.
View this post on Instagram