‘रंगीला’नंतरच्या एका वक्तव्यामुळे आमीर-राम गोपाल वर्माच्या नात्यात आले होते वितुष्ट, वाचा पुढे काय झालं…

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान (Amir Khan) आणि उर्मिला मातोंडकर यांचा सुपरहिट फिल्म 'रंगीला' (Rangeela) आजही प्रेक्षक आवडीने बघतात. या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.

‘रंगीला’नंतरच्या एका वक्तव्यामुळे आमीर-राम गोपाल वर्माच्या नात्यात आले होते वितुष्ट, वाचा पुढे काय झालं...
राम गोपाल वर्मा आणि आमीर खान
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 7:16 AM

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान (Amir Khan) आणि उर्मिला मातोंडकर यांचा सुपरहिट फिल्म ‘रंगीला’ (Rangeela) आजही प्रेक्षक आवडीने बघतात. या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1995 साली रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. पण या चित्रपटा नंतर आमीर खान आणि राम गोपाल वर्मा यांनी कधीही एकत्र काम केले नाही. आता या दुराव्याचे कारण समोर आले आहे. राम गोपाल वर्मा यांचे एक विधान आता खूप व्हायरल होत आहे (Ram Gopal Varma revel why amir khan stopped talking each other after rangeela release).

राम गोपाल वर्मा यांनी प्रेक्षकांसाठी अनेक सुपरहिट चित्रपट सादर केले आहेत. राम गोपाल वर्मा आता सोशल मीडियावरील आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी आमीर खानविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

आमीरबद्दल बोलताना म्हणाला…

हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर ‘रंगीला’ चे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी असे काही वक्तव्य केले होते की, ते ऐकल्यानंतर आमीर खानने त्याच्याशी थेट संबंध तोडले. या वक्तव्यानंतर दोघांमध्ये एक गैरसमज निर्माण झाला. काही वर्षांनंतर स्वत: राम गोपाल यांनी सांगितले की, पत्रकारांनी आमीरविषयी चुकीची टिप्पणी केली होती, ज्यामुळे त्याला तो ‘विश्वासघात’ वाटला. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, पुढे अशी गैरसमजांची मालिका बनली होती. दरम्यान, एका बातमी अहवालात असे लिहिले होते की, एका ‘वेटर’ने आमीरपेक्षा चांगले काम केले.’ यानंतर हा दुरावा आणखी वाढला (Ram Gopal Varma revel why amir khan stopped talking each other after rangeela release).

रामगोपाल वर्माने सांगितली संपूर्ण गोष्ट

काही वर्षांनंतर, राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे मी आमीरशी त्वरित संपर्क साधू शकलो नाही. तथापि, नंतर दोघांनी एकमेकांची भेट घेतली आणि त्यांचे गैरसमज दूर केले. वर्मा म्हणाले, ‘आमीर एक अतिशय समर्पित, भावूक आणि धैर्यवान माणूस आहे. मी तसा नाही. मी खूप आवेगपूर्ण माणूस आहे.’ ते म्हणाले की, त्यांच्यात आणि आमीरमध्ये ‘वादावादी’ नव्हती, तर ते ‘गैरसमज’ होते.

‘रंगीला’मध्ये आमीर खान आणि उर्मिला मातोंडकर यांच्यासह अभिनेते जॅकी श्रॉफदेखील मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची यश मिळवले होते. या चित्रपटातून उर्मिलाचा बोल्ड अवतारही प्रथमच प्रेक्षकांसमोर आला.

(Ram Gopal Varma revel why amir khan stopped talking each other after rangeela release)

हेही वाचा :

लतादीदींच्या गाण्यांची नक्कल करत गाणं शिकल्या, सुषमादेवींच्या आवाजाला तोड नाही; वाचा सविस्तर

Photo : ‘चल… विणू एक एक धागा तुझ्या माझ्या लवस्टोरीतला’, सावनी रविंद्रचं नवं गाणं ऐकलंत?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.