‘देवाच्या पाया पडताना असं…’, स‍िद्ध‍िव‍िनायक मंदिरात शिल्पा शेट्टीच्या ‘त्या’ कृतीमुळे चाहते नाराज

| Updated on: Jan 24, 2024 | 8:36 AM

shilpa shetty : स‍िद्ध‍िव‍िनायक मंदिरात शिल्पा शेट्टी हिने असं काय केलं, ज्यामुळे चाहते झाले नाराज... व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल..., सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी आणि व्हायरल व्हिडीओची चर्चा...

देवाच्या पाया पडताना असं..., स‍िद्ध‍िव‍िनायक मंदिरात शिल्पा शेट्टीच्या त्या कृतीमुळे चाहते नाराज
Follow us on

siddhivinayak mandir : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला अयोध्या याठिकाणी प्रभू राम यांच्या प्राम प्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. म्हणून शिल्पा हिने मुंबईतील स‍िद्ध‍िव‍िनायक मंदिरात जाऊन पूजा केली आणि ‘जय श्री राम’ असे नारे लावले. शिल्पाने सोमवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचून पूर्ण उत्साहात पूजा केली. पण स‍िद्ध‍िव‍िनायक मंदिरात देवाच्या पाया पडताना शिल्पा हिने केलेली कृती अनेकांना आवडलेली नाही. ज्यामुळे शिल्पा हिला ट्रोल करण्यात आलं. शिल्पा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा शेट्टी हिची चर्चा रंगली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शिल्पा स‍िद्ध‍िव‍िनायक मंदिरात पाया पडताना दिसत आहे. पण डोकं टेकवत असताना शिल्पा हिने प्रथम साडीचा पदर पुढे केला आणि त्यानंतर जमीनीवर डोकं  न टेकवता, साडीच्या पदरावर टेकवलं. शिल्पा हिच्या अशा कृतीमुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर शिल्पा हिचे चाहते देखील नाराज झाले आहेत..

व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘देवाच्या मंदिरात येवून देखील हिला तिच्या मेकअपची काळजी आहे….’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘डेकं जमीनीवर टेकवलं जातं… साडीच्या पदरावर नाही…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘देवाच्या पाया पडताना असं कोण करतं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा हिची चर्चा रंगली आहे.

 

 

सांगायचं झालं तर, प्रभू राम यांच्या प्राम प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत अनेक सेलिब्रिटी गेले होते. सोशल मीडियावर प्रभू राम यांच्या प्राम प्रतिष्ठा सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. पण ज्या सेलिब्रिटींना प्रभू राम यांच्या प्राम प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाता आलं नाही, त्यांनी इतर मंदिरांमध्ये जावून किंवा घरात पूजा केली..

शिल्पा शेट्टी हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सध्या शिल्पा ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री पोलीस महिला अधिकाऱ्याची भूमिकेत दिसत आहे. शिल्पा शेट्टी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. शिल्पा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर शिल्पा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.