Ram Setu | ‘राम लला’समोर ‘राम सेतु’चा मुहूर्त संपन्न, अक्षय कुमारने शेअर केला खास फोटो!

फोटो शेअर करत अक्षय कुमार याने लिहिले आहे की, ‘आज श्री अयोध्या जी में फ़िल्म "रामसेतु" के शुभारंभ पर भगवान श्री राम का आशीर्वाद प्राप्त हुआ। जय श्री राम!’ अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पोस्टद्वारे चाहते ‘राम सेतु’साठी खिलाडी कुमारला शुभेच्छा देत आहेत.

Ram Setu | ‘राम लला’समोर ‘राम सेतु’चा मुहूर्त संपन्न, अक्षय कुमारने शेअर केला खास फोटो!
राम सेतु मुहूर्त
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 4:40 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आता ‘राम सेतु’ या नव्या चित्रपटाच्या कामात व्यस्त झाला आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt bharucha) आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही (Actress jacqueline Fernandez) दिसणार आहेत. आज (18 मार्च) चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट चित्रपटाच्या मुहूर्तासाठी अयोध्येत पोहोचली आहे. ‘राम लला’ अर्थात ‘भगवान रामा’च्या पूजेने या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला आहे (Ram Setu Film Muhurat shot in Ayodhya akshay khumar share photo).

आज सकाळी अक्षय कुमार आपल्या टीमसह मुहूर्त शॉटसाठी अयोध्येला रवाना झाला होता. त्याने जॅकलिन आणि नुसरतबरोबर एक फोटो देखील शेअर केला होता. ‘आता चित्रपटाची वेळ शुभ झाली आहे’, असे म्हणत अक्षयने एक फोटो शेअर करुन याविषयी माहिती दिली होती.

अक्षयने शेअर केला ‘मुहूर्ता’चा खास फोटो!

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

नुकताच अक्षय कुमारने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात संपूर्ण राम दरबार दिसत आहे, त्यासोबतच्या या फोटोमुळे मुहूर्त पूजा पार पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच हा फोटो अक्षयच्या नव्या चित्रपटाची सुरूवात आहे. यासह अक्षयने एक खास कॅप्शनही लिहिले आहे.

फोटो शेअर करत अक्षय कुमार याने लिहिले आहे की, ‘आज श्री अयोध्या जी में फ़िल्म “रामसेतु” के शुभारंभ पर भगवान श्री राम का आशीर्वाद प्राप्त हुआ। जय श्री राम!’ अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पोस्टद्वारे चाहते ‘राम सेतु’साठी खिलाडी कुमारला शुभेच्छा देत आहेत.

असे दिसले कलाकार!

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

(Ram Setu Film Muhurat shot in Ayodhya akshay khumar share photo)

अक्षय कुमार विमानतळावर अगदी कूल लूकमध्ये दिसला होता. त्याने ब्लॅक शर्टसह राखाडी ट्राऊझर परिधान केली होती. तर, त्याचवेळी नुसरत आणि जॅकलिन व्हाईट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. जॅकलिनने पांढऱ्या रंगाचा सलवार सूट घातला होता आणि नुसरतने पांढऱ्या रंगाच्या मॅक्सी ड्रेससह रंगीबेरंगी श्रग आणि सिल्व्हर ज्वेलरी परिधान केली होती.

अयोध्येत होणार चित्रीकरण

चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी सांगितले की, येत्या काही महिन्यांत चित्रपटाचे 80 टक्के शेड्युल अयोध्येत शूट केले जाईल. त्यानंतरच्या शेड्युलचे शूटिंग मुंबईत होणार आहे. या चित्रपटात अक्षय पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार असल्याचेही दिग्दर्शकाने सांगितले आहे. अक्षयच्या चाहत्यांना ‘राम सेतु’मधील त्याचा नवा लूक आणि नवे पात्र लवकरच पाहायला मिळणार आहे. (Ram Setu Film Muhurat shot in Ayodhya akshay khumar share photo)

दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटाची घोषणा

जेव्हा, अक्षय कुमारने या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले तेव्हा त्यांने लिहिले होते की, ‘ही दिवाळी म्हणजे भारत राष्ट्राचा आदर्श आणि भगवान श्रीरामाची महान स्मृती, येणाऱ्या युगांपर्यंत भारतीय संस्कृती सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. चला सगळ्या पिढ्यांना रामाशी जोडूया. या प्रयत्नात आमचा एक छोटासा संकल्पही आहे, ‘राम सेतु’, आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.’

अक्षय कुमारने नुकतेच आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचा ‘सूर्यवंशी’ही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सूर्यवंशीची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे प्रमोशन अक्षय त्याच्या खास स्टाईलमध्ये करतो आहे. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल 5’ सारख्या चित्रपटांतून आपले मनोरंजन करणार आहे.

(Ram Setu Film Muhurat shot in Ayodhya akshay khumar share photo)

हेही वाचा :

First Photo | अमृता राव-आरजे अनमोलने शेअर केला बाळाचा फोटो, पाहा ‘वीर’ची पहिली झलक!

Vamika | विराट-अनुष्काच्या नेमप्लेटवर आता ‘वामिका’चंही नाव, पाहा हा क्युट Photo

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.