अनुराग कश्यपला अटक करा, रामदास आठवलेंची मागणी
सुशांतच्या वकिलानेही हीच शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता आठवलेंनीही असं म्हटलं आहे. (Ramdas Athawale on Payal Ghosh allegation to Anurag Kashyap)
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहे. तिच्या या खळबळजनक आरोपांमुळे अनुरागवर सध्या जोरदार टीका होत आहे. तसेच अनुराग कश्यपला अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. (Ramdas Athawale on Payal Ghosh allegation to Anurag Kashyap)
“पायल घोषला न्याय देण्यासाठी आरपीआय देशभर आंदोलन करणार आहे. तसेच याप्रकरणी पायल घोषप्रकरणी अनुराग कश्यपला अटक केली पाहिजे. अनुराग कश्यपला अटक न केल्यास ओशिवरा पोलीस स्टेशनला घेराव घालू,” असेही रामदास आठवले म्हणाले.
सुशांत प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेला तपास संशयास्पद
तसेच “अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयने अधिक गतीने करावी. सुशांतची गळा दाबून हत्या केली आहे,” अशी शंका रामदास आठवले यांनी उपस्थित केली आहे. यापूर्वी सुशांतच्या वकिलानेही हीच शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता आठवलेंनीही तशी शक्यता वर्तवली आहे.
“सुशांत राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाप्रकरणी रामदास आठवले यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. मुंबई पोलिसांनी केलेला तपास संशयास्पद आहे, असे रामदास आठवलेंनी सांगितले. सुशांतच्या तपासाप्रमाणे त्याची मॅनेजर दिशा सालीयनची मृत्यूची चौकशी सीबीआयने करावी,” असेही आठवलेंनी म्हटलं.
सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज अँगलसमोर आला. त्याप्रकरणी धर्मा प्रोडक्शन्सचे संचालक निर्माता क्षितीज प्रसाद, अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची एनसीबीकडून चौकशी केली जात आहे.
ड्रग्ज घेणाऱ्या कलाकाराला काम देऊ नये
“ड्रग्ज घेणाऱ्या कलाकाराला निर्मात्यांनी काम देऊ नये. जर अशा कलाकारांना काम दिलं तर आरपीआय आंदोलन करुन शुटींग बंद पाडेल, असा इशाराही रामदास आठवलेंनी दिला. ड्रग्जप्रकरणी अभिनेत्रींची नावं पुढे आली आहेत. मात्र अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शकांची नावे अद्याप पुढे आलेली नाही. त्यांची नावेही लवकरात लवकर पुढे यायला हवी,” अशी मागणीही आठवलेंनी यावेळी केली. (Ramdas Athawale on Payal Ghosh allegation to Anurag Kashyap)
पायल घोषकडून अनुरागवर आरोप
“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचं खरं रुप जगासमोर येईल. माझ्या या वक्तव्यामुळे मला धोका होऊन माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने घोषन काही दिवसांपूर्वी केलं होतं.
अनुरागने आरोप फेटाळले
“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने तिच्या ट्विटनंतर केलं आहे. (Ramdas Athawale on Payal Ghosh allegation to Anurag Kashyap)
संबंधित बातम्या :