Bollywood | फुटबॉल मॅच पाहण्यासाठी रणबीर-आलिया एकत्र, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्रीआलिया भट्ट यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. ही जोडी सध्या गोव्यात स्पॉट झाली आहे. (Ranbir Kapoor Alia Bhatt)

Bollywood | फुटबॉल मॅच पाहण्यासाठी रणबीर-आलिया एकत्र, फोटो व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 4:02 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही जोडी नेहमीच चर्चेत असते.बऱ्याच दिवसांनंतर ही जोडी पुन्हा एकदा  गोव्यात स्पॉट झाली आहे. मुंबई सिटी FC आणि जमशेदपूर FC या दोन टीममध्ये सुरु असलेल्या फुटबॉल मॅचदरम्यान ही जोडी कॅमेऱॅत कैद झाली. त्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. (Ranbir Kapoor and Alia Bhatt spot in goa enjoying football match)

मिळालेल्या माहितीनुसार आलिया आणि रणबीर ही जोडी सोमवारी मुंबईहून गोव्याकडे रवाना झाली. यावेळी दोघांनीही आपली आवडती टीम मुंबई सिटी FC ची जर्सी परिधान केली होती. या दोघांचेही फोटो व्हायरल झाल्यानंतर मुंबई सिटी FC टीमने आपल्या अधिकृत पेजवर त्यांचे फोटो शेअर केले. यावेळी फोटो शेअर करताना “TheIslanders यांना सपोर्ट करण्यासाठी खास मुंबईवरून” असे कॅप्शनही त्यांनी दिले.

रणबीर आणि आलीया यांच्याबद्दल माध्यमांमध्ये अनेक चर्चा रंगतात. 2020 मध्ये हे दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. मध्यंतरी रणबीर आणि आलिया यांच्या परिवारांध्येही चांगलीच जवळीकता निर्माण झाली होती. रणबीर कपूरच्या घरातील अनेक कार्यक्रमांत आलिया उपस्थित असल्याचे फोटोदेखील अनेकदा व्हायरल झालेले आहेत. मात्र, कपूर परिवारासाठी 2020 हे वर्ष अत्यंत वाईट राहिले. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन याच वर्षी झाले.V (Ranbir Kapoor and Alia Bhatt spot in goa enjoying football match)

ऋषी कपूर यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये काही काळ उपचार करण्यात आले. यावेळीसुद्धा आलिया ऋषी कपूर यांना भेटायला गेली होती. दरम्यान आलिया आणि रणबीर विवाहबंधनात कधी अडकणार हे जरी त्यांनी जाहीर केले नसले तरी, ब्रह्मास्त्र नावाच्या चित्रपटामध्ये ते एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात दोघेही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार याची अधिकृत माहिती निर्मात्याने जाहीर केलेली नाही.

संबंधित बातम्या :

सारा अली खानच्या ‘त्या’ व्हिडिओला वरुण आणि रणवीर केले जोरदार ट्रोल!

Remo D’Souza | नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाने सर्जरीनंतर केला ‘डान्स’ तुफान व्हायरल होतोय तो व्हिडिओ

बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत थलपती विजयचा ‘मास्टर’ ठरला सर्वात फेव्हरेट चित्रपट

(Ranbir Kapoor and Alia Bhatt spot in goa enjoying football match)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.