“तू खूप चांगला नवरा आहेस, पण सैफ…” रणबीरचे कौतुक तर, करीनाची सैफवर नाराजी
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अनेकदा त्यांच्या मुलीबद्दल अनेक गोष्टी सांगताना दिसतात. रणबीरने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याने आलियासोबत एक आठवडा रुग्णालयात कसा घालवला. होता ते.

बॉलिवूडमध्ये सर्वात प्रसिद्ध जोडी कोणी असेल तर ती रणबीर आलिया आणि त्यांची मुलगी राहा यांची आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी रिया आता दोन वर्षांची आहे. आलिया-रणबीर राहासह अनेकदा स्पॉट होत असतात. दोघेही आई-बाबा म्हणून त्यांची उत्तम जबाबदारी पार पाडतात. सोबतच रणबीर हा एक उत्तम पती असल्याचंही आलियाने अनेकदा सांगितलं होतं. पण याच सर्व गोष्टींवर रणबीरने एका मुलाखतीत काही गोष्टी सांगितल्या होत्या.
रणबीर कपूरने एक आठवडा रुग्णालयात घालवला
करीना कपूरला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरने सांगितले होते की राहाच्या जन्माच्या वेळी त्याने आलियासोबत एक संपूर्ण आठवडा रुग्णालयात कसा घालवला होता. रणबीरच्या या समर्पणाचे त्याची बहीण करीना कपूरने खूप कौतुक केले आणि करीनाने राहाच्या जन्मानंतर रणबीरने संपूर्ण आठवडा रुग्णालयात घालवला,आलियाची काळजी घेतली याबद्दल मुलाखतीमध्ये तिने तोडंभरून भावाचं कौतुक केलं. मात्र याच गोष्टीवरून करीनाने सैफवर असलेली तिची नाराजीही व्यक्त केली. करीना म्हणाली, सैफ अली खानने त्यांच्या दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळी एकही रात्र रुग्णालयात घालवली नाही. याबद्दल तिने नाराजी व्यक्त केली होती.
राहाच्या जन्मापूर्वी दोन-तीन महिने कामापासून ब्रेक
पालकत्वाबद्दल बोलताना, रणबीर कपूरने करीनाच्या मुलाखतीत सांगितले की त्याने राहाच्या जन्मापूर्वी दोन-तीन महिने कामापासून ब्रेक घेतला होता आणि तसेच आलियासोबत तो संपूर्ण आठवडा रुग्णालयात घालवला होता. त्यानंतर करीना कपूरने तिच्या रणबीरचे कौतुक करत म्हटलं होतं की, “याचा अर्थ तू खूप चांगला नवरा आहेस आणि बघ, सैफने माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये एकही रात्र घालवली नाही”
Kareena Kapoor via her insta story ❣️ #RanbirKapoor #KareenaKapoor pic.twitter.com/wk4oMQS7Ot
— Ranbir Kapoor Universe (@RanbirKUniverse) February 24, 2023
करीना कपूर आणि सैफ अली खान यांना दोन मुले आहेत.
करीना कपूर आणि सैफ अली खान यांना तैमूर आणि जेह ही दोन मुले आहेत. करिना आणि सैफचे लग्न 2012 मध्ये झालं. करिनाने डिसेंबर 2016 मध्ये तैमूरला जन्म दिला आणि जेहचा जन्म फेब्रुवारी 2021 मध्ये झाला. दुसरीकडे, रणबीर आणि आलियाला एकच मुलगी आहे. पण, त्याने अनेक मुलाखतींमध्ये दुसऱ्या मुलाची इच्छा व्यक्त केली आहे.
आलिया भट्टने तिच्या दुसऱ्या मुलाच्या नावाचाही केला आहे विचार
आलिया भट्टने अलीकडेच सांगितले की तिने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव आधीच विचारात घेतले आहे. जय शेट्टीच्या पॉडकास्टमध्ये आलियाने राहाच्या नावामागील कहाणी देखील उघड केली. ती म्हणाला की जर त्यांचे दुसरे मूल मुलगा असेल तर तिने त्याच्यासाठीही एक खास नाव ठरवलं आहे. आलिया म्हणाली की तिला आणि रणबीरला त्यांच्या मुलांना सर्वोत्तम नाव द्यायचं आहे.