या अभिनेत्रीवर गोविंदाचे घर फोडल्याचा आरोप; गोविंदाने कुटुंब सोडण्यास नकार दिल्याने ब्रेकअप
बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री जिने अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना भुरळ घातली आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत, पण तिच्या अफेअर्सची चर्चाही तेवढीच झाली आहे. गोविंदा सोबतच्या अफेअरमुळे तिच्यावर त्याचे घर फोडल्याचा आरोपही झाला. शेवटी गोविंदाने लग्न करण्यास अन् कुटुंब सोडण्यास नकार दिल्याने त्यांचं ब्रेकअप झालं. कोण आहे ही अभिनेत्री?

बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जिने तिच्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांनाच भूरळ घातली. या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच या अभिनेत्रीच्या अफेअर्सचीही तेवढीच चर्चा झाली आहे. एवढंच नाही तर या अभिनेत्रीवर चक्क गोविंदाचं घर फोडल्याचाही आरोप झाला होता.
ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी. राणीचे सर्वच अफेअर्स फोल ठरल्यानंतर अखेर तिने इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध निर्मात्याशी लग्न केलं. राणीच्या लग्नाची बातमी ऐकून तिचे चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. मोठी गोष्ट म्हणजे आजपर्यंत कोणीही त्यांच्या लग्नाचे फोटोही पाहिलेले नाहीयेत.तिचे प्रेम जीवन नेहमीच चर्चेत राहिले आहे . तिचे लग्न इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता आदित्य चोप्राशी झाले आहे. त्यांनी हे लग्न इतके गुप्तपणे केले होते की कोणालाही त्याची माहिती मिळाली नव्हती.
राणीचे अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडले गेले
राणी मुखर्जीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून केली. चित्रपटाला काही खास प्रतिसाद मिळाला नव्हता पण तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. त्यानंतर आमिर खानसोबत ‘गुलाम’ या चित्रपटाने तिचं नशीबच चमकलं. चित्रपटातील ‘आती क्या खंडाळा’ या गाण्यानंतर राणी मुखर्जीच्या अभिनय कारकिर्दीला एक नवीन दिशा मिळाली.
आमिर खान आणि अभिषेक बच्चनसोबत राणीच्या अफेअर्सच्या चर्चा
राणी मुखर्जीचा चित्रपट आल्यानंतर तिचे नाव आमिर खानशीही जोडले गेले होते . या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचीही खूप चर्चा झाली. राणी मुखर्जीने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की ती आमिर खानवर खूप करते मात्र त्यानंतर त्यांच्या नात्याचं पुढे काही झालं नाही. त्यानंतर तिचं नाव अभिषेक बच्चनसोबतच्या तिच्या अफेअरबद्दलही बरीच चर्चा झाली. त्यांचे नाते हे लग्नापर्यंत गेले होते असही म्हटलं जातं. दोघांनी ‘युवा’ आणि ‘बंटी और बबली’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही आणि नंतर ते दोघेही वेगळे झाले.
View this post on Instagram
गोविंदासोबत अफेअर आणि घर फोडल्याचा तिच्यावर होणारा आरोप
पण राणीचे नाव जर कोणासोबत जास्त चर्चेत आलं तर ते गोविंदासोबत. 2000 साली राणी आणि गोविंदाने ‘हद कर दी आपने’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट खूप हिट ठरला. यानंतर, राणी आणि गोविंदाने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यानंतर त्यांच्याही अफेअरच्या चर्चा येऊ लागल्या. तसेच राणीवर गोविंदाचे घर उद्ध्वस्त केल्याचा आरोपही करण्यात आला. असे म्हटले जाते की गोविंदा राणीशी लग्न करण्यास आणि त्याचे कुटुंब सोडण्यास तयार नव्हता, यामुळेच त्यांचे नाते तिथेच संपले. पण त्यांच्या नात्यांच्या चर्चा आजही होतात आणि त्यानंतर पुन्हा राणी-गोविंदाने एकत्र काम करणही टाळलं.