Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राशाचा गोविंदाच्या मुलासोबत ‘अंखियों से गोली मारे’ गाण्यावर जबरदस्त डान्स, राशा आईसारखीच भन्नाट नाचली

रवीना टंडनची मुलगी राशा थडानी आणि गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही गोविंदा आणि रवीनाच्या 'अंखियों से गोली मारे' या हिट गाण्यावर, डान्स करताना दिसत आहे. राशाने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. राशाने रवीनासारखाच जबरदस्त डान्स केला आहे.

राशाचा गोविंदाच्या मुलासोबत 'अंखियों से गोली मारे' गाण्यावर जबरदस्त डान्स, राशा आईसारखीच भन्नाट नाचली
Follow us
| Updated on: Mar 02, 2025 | 11:05 AM

90 च्या दशकातील सेलिब्रिटी त्यांची गाणी तसेच डान्सच्या स्टेप्स आजही तेवढ्याच प्रसिद्ध आहे. सेलिब्रिटी किड्सही या जुन्या गाण्यांच्या प्रेमाच असलेलं पाहायला मिळतं. 90 ची गोविंदा आणि रवीनाची जोडी म्हणजे आजही लोकप्रिय आहे. त्यांचे चित्रपट आणि गाणी अजूनही लोकांच्या हृदयात आणि मनात आहेत. दोघेही खऱ्या आयुष्यातही चांगले मित्र आहेत सोबतच त्यांची मुले यशवर्धन आहुजा आणि राशा थडानी देखील एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

राशा थडानी आणि यशवर्धन यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत

दरम्यान राशा थडानी आणि यशवर्धन यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघेही गोविंदा-रवीनाच्या गाण्यावर भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहेत. राशा थडानीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने गोविंदाचा मुलगा आणि तिचा चांगला मित्र असलेल्या यशवर्धन आहुजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यशवर्धनने 28वां वाढदिवस सेलिब्रेट केला आहे. तसेच राशाने यशसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. हा सेल्फी शेअर करताना तिने ‘हॅपी बर्थडे यशवर्धन’ असं लिहिले आहे. त्यानंतर तिने त्यांचा डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.

राशा थडानी तिच्या आई रवीनासारखीच नाचली.

व्हिडिओमध्ये राशा थडानी आणि यशवर्धन पार्टीत नाचताना दिसत आहेत. दोघेही गोविंदा आणि रवीनाच्या ‘अंखियों से गोली मारे’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. राशा तिची आई रवीना टंडन सारखीच जबरदस्त डान्स करताना दिसली. त्यांचा हा डान्स नेटकऱ्यांनाही फार आवडला आहे.

व्हिडिओमध्ये यशवर्धन आहुजा हुडी घातलेला दिसतोय, तर राशा शर्ट आणि पँटमध्ये आहे. दोघांच्याही डान्समुळे नेटकऱ्यांना गोविंदा आणि रवीना टंडनची आठवण झाली. राशाने ‘आझाद’ या पीरियड ड्रामामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिच्यासोबत अमन देवगणनेही याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

दरम्यान गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्या घटस्फोटांच्या चर्चा सुरु असून खरंच ते दोघेही घटस्फोट घेणार आहेत का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच नुकत्याच झालेल्या यशवर्धनच्या बर्थडे पार्टीमुळे नक्की त्यांच्या घराताली वातावरण खरंच तेवढं गंभीर आहे का?  असा प्रश्नही नक्कीच पडतो.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.