Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood : साडी उतरवणार ना किस देणार… ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्याआधी रवीना टंडनने ठेवल्या होत्या ‘या’ अटी!

'टिप टिप बरसा पाणी' गाण्यामुळे रविना टंडन चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. पण रविनाने आधी या गाण्यासाठी नकार दिला होता. त्यामागचं कारण देखील तिनं सांगितलं होतं.

Bollywood : साडी उतरवणार ना किस देणार... 'टिप टिप बरसा पानी' गाण्याआधी रवीना टंडनने ठेवल्या होत्या 'या' अटी!
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 11:28 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. रविनानं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. रविनाचं टिप टिप बरसा पाणी हे गाणं तर सुपरहिट ठरलं होतं. या गाण्यामुळे ती अजूनही चर्चेत येते. तिच्या या गाण्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. आजही प्रेक्षक हे गाणं तितक्याच आवडीने पाहतात.

‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्यामुळे रविना टंडन चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. पण रविनाने आधी या गाण्यासाठी नकार दिला होता. त्यामागचं कारण देखील तिनं सांगितलं होतं. रवीना म्हणालेली की हे गाणं किती कामुक असेल याची काळजी तिला वाटत होती. पण नंतर तिला निर्मात्यांनी पटवून दिल्यानंतर ती हे गाणं करायला तयार झाली.

द न्यू इंडियनला दिलेल्या मुलाखतीत रवीनाला टिप टिप बरसा पाणी या गाण्याबाबत विचारलं होतं. यावेळी रवीनाला हे गाणं करताना संकोच का वाटत होता याबाबत सांगितलं. यावेळी तिनं सांगितलं की sexuality आणि sensuality यामध्ये एक मोठी रेष असते.

रविनानं सांगितलं की, तिच्या मते पूर्ण अंग झाकूनही कोणीही सेक्सी दिसू शकते. हे सगळं त्यांच्या चेहर्‍याचे हावभाव आणि डोळ्यांवर अवलंबून असते. टिप टिप बरसा पाणी गाण्याबाबत बोलताना मी स्पष्टपणे सांगितलं होते की, माझी साडी उतरणार नाही, किस केलं जाणार नाही, त्यामुळे या गाण्यावर टिकच्या ऐवजी क्रॉसचे चिन्ह जास्त होते. त्यानंतर आम्ही टिप टिप बरसा पाणी गाणं घेऊन आलो.

दरम्यान, ‘मोहरा’ या चित्रपटात रविना टंडन सोबत अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि नसीरूद्दीन शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. सोबतच या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना वेड लावलं होतं, ज्यामध्ये टिप टिप बरसा पाणी सोबत तू चीज बडी है मस्त मस्त हे गाणंही हिट ठरलं होतं.

एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू.
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.