तमन्ना भाटियासोबत रिलेशनशिप, तरीही करीनावर वन साईड लव्ह… अभिनेत्याने दिली जाहीर कबुली
तमन्ना आणि विजय ही जोडी चाहत्यांमध्ये हिट ठरली आहे. विजय एकीकडे तमन्ना भाटिया हिच्यासोबत डेटिंग करत असला तरी त्याने आपले दुसऱ्या अभिनेत्रीवर प्रेम असल्याची कबुली दिलीय.
नवी दिल्ली | 13 मार्च 2024 : बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचे नाव बॉलिवूडच्या लव्हबर्ड्समध्ये घेतले जाते. काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी त्यांच्यामधील नात्याला दुजोरा दिला आहे. तमन्ना आणि विजय ही जोडी चाहत्यांमध्ये हिट ठरली आहे. बॉलिवूडच्या हॉट कपल्सपैकी ही एक जोडी मानली जाते. ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये त्यांची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. इथूनच त्यांच्या नात्याला सुरवात झाल्याची चर्चा आहे. पण, विजय एकीकडे तमन्ना भाटिया हिच्यासोबत डेटिंग करत असला तरी त्याने आपले दुसऱ्या अभिनेत्रीवर प्रेम असल्याची कबुली दिलीय.
विजय करिश्मा कपूरसोबत मर्डर मुबारक या चित्रपटात काम करत आहे. हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मर्डर मुबारकमध्ये विजय सोबत करिष्मा कपूर, सारा अली खान, संजय कपूर, डिंपल कपाडिया, पंकज त्रिपाठी यांच्याही भूमिका आहेत. मर्डर मुबारक चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
मर्डर मुबारक चित्रपटाची कथा एका क्लबमध्ये झालेल्या हत्येवर आधारित आहे. ज्याचा तपास एका पोलीस अधिकारी करत आहे. विजय हा या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत आहे. अनुजा चौहान यांच्या क्लब यू टू डेथ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट होमी अदजानिया यांनी दिग्दर्शित केला आहे.
मर्डर मुबारकच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीमध्ये विजय वर्मा आणि करिष्मा कपूर सहभागी झाले होते. यावेळी त्याने कपूर बहिणींबद्दल सांगितले. याच मुलाखतीत विजय याने करिष्मा हिची बहिण करीनावरील एकतर्फी प्रेमाची कबुली दिली. जे ऐकून करिश्मा आश्चर्यचकित झाली.
करीना कपूर आणि विजय वर्मा यांनी ‘जाने जान’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. लोकांनी करिनाबद्दलची माझी ओढ पाहिली आहे. हे करीनासाठी एकतर्फी प्रेम होते. एक प्रेम जिथे तुम्ही एखाद्यावर दुरून प्रेम करता. मी आणि करिश्मा चांगले मित्र झालो. आमची चांगली मैत्री आहे. पण, करीना हिच्यावर माझे प्रेम आहे. मी तिचा चाहता आहे, असे विजय वर्मा यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले.