मोदीजी आधी तुमच्या आयटी सेलवाल्यांना आवरा, तेच खरे तुकडे गँग, अभिनेत्री रेणुका शहाणेंचा हल्लाबोल

आपल्या रोखठोक भूमिकांसाठी परिचीत असलेल्या अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahanes reply to PM Modi) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

मोदीजी आधी तुमच्या आयटी सेलवाल्यांना आवरा, तेच खरे तुकडे गँग, अभिनेत्री रेणुका शहाणेंचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Dec 17, 2019 | 10:42 AM

मुंबई : आपल्या रोखठोक भूमिकांसाठी परिचीत असलेल्या अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahanes reply to PM Modi) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात जाळपोळ आणि हिंसा सुरु असताना, मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यामातून देशवासियांना शांततेचं आवाहन केलं आहे. मात्र अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahanes reply to PM Modi) यांनी आधी तुमच्या आयटी सेलवाल्यांना आवरा, असा थेट सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला. इतकंच नाही तर भाजपची आयटी सेल हीच खरी तुकडे-तुकडे गँग आहे, असा घणाघातही रेणुका शहाणे यांनी केला.

नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील राड्यानंतर, देशभरात जाळपोळ सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी काल 16 डिसेंबरला दुपारी दोन वाजता ट्विट करुन, शांततेचं आवाहन केलं. मोदींच्या या ट्विटला कोट करत, रेणुका शहाणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

मोदींना ट्विट करताना रेणुका शहाण्या म्हणाल्या, “सर, कृपया सर्वसामान्य लोकांना तुमच्या सर्व आयटीसेलच्या ट्विटर हॅण्डलपासून लांब राहण्यास सांगा. कारण सर्वाधिक अफवा, चुकीची माहिती, भाजपच्या आयटीसेलच्या माध्यमातूनच पसरवली जाते.  या अफवा देशातील बंधुत्व, शांती आणि एकतेच्या विरोधात आहेत.  खरी तुकडे-तुकडे गँग तुमची आयटी सेल आहे. कृपया द्वेष पसरवण्यापासून त्यांना थांबवा”

रेणुका शहाणेंचं हे ट्विट जवळपास 9 हजारांपेक्षा जास्त युजर्सनी रिट्विट केलं आहे. शिवाय 23 हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक आणि जवळपास 2 हजारापर्यंत कमेंट केल्या आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात राडा

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात जाळपोळ आणि हिंसा सुरु आहे. दिल्लीतील जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईनंतर विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्येही छात्रभारती आणि इतर विद्यार्थी संघटनांनी जोरदार आंदोलन केलं. यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले(Police action in Jamia University). छात्रभारती विद्यार्थी संघटनेने आवाहन केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील आंदोलनाला अनेक विद्यार्थी संघटना, प्राध्यापक आणि पुरोगामी सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला.

दिल्लीत जाळपोळ

नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागलं.(Delhi Protest against citizenship act)  राजधानी दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी 3 बस आणि काही मोटारसायकलींची जाळपोळ (Delhi Protest against citizenship act) केली. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली. त्यात अग्निशमन दलाचे 2 जवान जखमी (Delhi Protest against citizenship act) झाले.

संबंधित बातम्या  

विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईविरोधात मुंबई विद्यापीठात जोरदार आंदोलन  

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा

CAB Bill : लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर

मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.