Sushant Death | आधी कंपनीच्या नावात ‘रिया’लिटी शब्द आणला, मग संचालकपद सोडले, रिया चक्रवर्ती संशयाच्या भोवऱ्यात

नवी मुंबईतील पत्त्यावर ज्या दोन कंपन्या नोंदणीकृत आहेत, ती प्रॉपर्टी रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्या नावावर आहे.

Sushant Death | आधी कंपनीच्या नावात 'रिया'लिटी शब्द आणला, मग संचालकपद सोडले, रिया चक्रवर्ती संशयाच्या भोवऱ्यात
Follow us
| Updated on: Jul 31, 2020 | 12:48 PM

नवी मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती संशयाच्या भोवऱ्यात आहे. सुशांतने स्थापन केलेल्या कंपनीत रिया आणि तिच्या भावाला संचालकपद देण्यात आले होते, मात्र सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधी रियाने ते सोडल्याने भुवया उंचावल्या आहेत. (Rhea Chakraborty resigned as Director of Navi Mumbai Company established by Sushant Singh Rajput)

सुशांतसिंह राजपूतने सप्टेंबर 2019 मध्ये ‘विव्हिडरेज रियालिटीएक्स प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी सुरु केली. रिया चक्रवर्ती आणि सुशांत यांची कंपनीबाबत बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. रियाच्या सांगण्यावरुन कंपनीच्या नावात ‘रिया’चे नाव ‘रिया’लिटी अशा पद्धतीने समाविष्ट झाले.

एवढेच नाही तर रियाने आपला भाऊ शोविक चक्रवर्ती यांनाही संचालक बोर्डावर घेतले होते. कंपनीत संचालकपद देण्याबाबत सुशांतला राजी करण्यात आले होते, असे बोलले जाते.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

एक-दोन महिन्यांनंतर सुशांतला गंभीर नैराश्याने ग्रासले आणि मुंबईतील चार वेगवेगळ्या डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याच वेळी, जानेवारी 2020 मध्ये रियाचा भाऊ शोविकने सुशांतबरोबर ‘फ्रंट इंडिया फॉर वर्ल्ड फाऊंडेशन’साठी आणखी एक कंपनी सुरु केली.

या दोन कंपन्या नवी मुंबईतील उलवे परिसरातील ‘साई फॉर्च्यून’ बिल्डिंगच्या फ्लॅट नंबर ए-503 या पत्त्यावर नोंदणीकृत आहेत. ही प्रॉपर्टी रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्या नावावर आहे.

हेही वाचा : बिहार पोलिसांच्या तपासाचा धडाका, आधी कोटक बॅंकेत तपास, मग अंकिताचा जबाब

सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधी रिया चक्रवर्तीने संशयास्पद पद्धतीने ‘विव्हिडरेज रियालिटीएक्स प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक पद सोडले. त्यामुळे तिच्यावर संशय बळावत आहे.

सुशांतच्या मृत्यूच्या 40 दिवसानंतर वडिलांनी पाटणा पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला. तीन पानी तक्रारीत त्यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही सुशांतच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपानंतर या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीला वेगऴे वळण लागले आहे. पाटणा पोलिसांचे पथक मुंबईत दाखल चौकशी करत आहे.
पाटणा पोलिसांच्या तपासातील महत्त्वाचे मुद्दे 
1. केवळ काही दिवसाच्या अवधीत सुशांतच्या बँक खात्यातून 11 कोटी रुपये काढले गेले. ते पैसै नेमके कुठे गेले. त्याचा तपास सुरु झाला आहे. या अंतर्गत पोलिसांनी कोटक महिंद्रा बँकेतही चौकशी केली आहे.
2. सुशांतने एक कंपनी स्थापन केली होती. त्यामध्ये रिया, तिचा भाऊही संचालक बोर्डात होता. मात्र सुशांतच्या मृत्यूनंतर या कंपनीतून रिया आणि तिच्या भावाने काढता पाय घेतला. त्यामुळे आता या कंपनीत नेमके काय सुरु होते, किती रुपयांचे व्यवहार  या कंपनीच्या माध्यमातून झाले होते, या कंपनीत कुणाचा किती स्टेक किती होता, रिया आणि तिच्या भावाचा नेमका काय रोल होता, या सर्वांची सखोल चौकशी आता होणार आहे.

संबंधित बातम्या :

 पाटणा पोलीस कोटक बँकेत, तपास CBI नव्हे तर मुंबई पोलिसांकडेच

 रियाने सुशांतला खूप त्रास दिला, अंकिता लोखंडेचा धक्कादायक जबाब, व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा दाखला

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बिहार पोलीस मुंबईत, रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत

(Rhea Chakraborty resigned as Director of Navi Mumbai Company established by Sushant Singh Rajput)

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.