Rhea Chakraborty | होळीच्या निमित्ताने रियाला आली सुशांतची आठवण, पोस्ट लिहित म्हणाली…

एका नवीन सोशल मीडिया पोस्ट मधून तिने तिच्या प्रेमावरचा विश्वास व्यक्त केला आहे. रियाने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिच्यासोबत आणखी एक महिला दिसत आहे. दोघांचे फोटो शेअर करण्याबरोबरच रियाने लेखक रॉबर्ट फाल्घॅम यांचा एक कोटही शेअर केला आहे.

Rhea Chakraborty | होळीच्या निमित्ताने रियाला आली सुशांतची आठवण, पोस्ट लिहित म्हणाली...
रिया चक्रवर्ती
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 12:34 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिने ती सुशांतची गर्लफ्रेंड असल्याचे जाहीर केले. खुद्द रियाने सोशल मीडियावर याची पुष्टी केली होती आणि सांगितले की, ती सुशांतला बर्‍याच दिवसांपासून डेट करत होती. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाबद्दल बर्‍याच चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या. तिनेच सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केले असावे, असा आरोपही अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी रियावर केला होता (Rhea Chakraborty share post about love is she missing sushant on the occasion of holi).

यानंतर ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला अटकही करण्यात आली होती. ती जवळपास एक महिना तुरूंगात होती. बरं, इतका त्रास सहन करूनही रियाचा तिच्या प्रेमावरील विश्वास कमी झालेला नाही. आजही तिचा तिच्या प्रेमावर विश्वास आहे. एका नवीन सोशल मीडिया पोस्ट मधून तिने तिच्या प्रेमावरचा विश्वास व्यक्त केला आहे. रियाने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिच्यासोबत आणखी एक महिला दिसत आहे. दोघांचे फोटो शेअर करण्याबरोबरच रियाने लेखक रॉबर्ट फाल्घॅम यांचा एक कोटही शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवरून रिया होळीच्या दिवशी सुशांतला मिस करत असल्याचे दिसते आहे.

रियाने लिहिले, ‘प्रेम ही शक्ती आहे … प्रेम एक कपडा आहे ज्याचा रंग कधीच फिका होत नसतो. कितीही धुतला तरी त्याची चमक जात नाही.’

पाहा रिया चक्रवर्तीची पोस्ट :

 (Rhea Chakraborty share post about love is she missing sushant on the occasion of holi)

रिया लहान कलाकार, निर्मात्यांचा टोला

अभिनेत्री रिया चक्रवर्ती लवकरच आगामी ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये रियाची एक झलक दिसली होती, परंतु रिया चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरमधून गायब होती. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे निर्माता आनंद पंडित यांना याबद्दल विचारले असता त्यांनी रियाबद्दल मोठे विधान केले. आनंद म्हणाले होते की, ‘या चित्रपटाचे मुख्य कलाकार अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी आहेत, त्यामुळे माझे संपूर्ण लक्ष त्या दोघांवरच आहे. मी दुसर्‍या बाजूच्या कलाकारांवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मी केवळ तरुण कलाकारांना नव्हे तर, मुख्य कलाकारांकडे जास्त लक्ष देईन.’

त्यानंतर जेव्हा टीझर आणि पोस्टरमध्ये दिसलेल्या टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाबद्दल आनंद यांना प्रश्न विचारला गेला असता ते म्हणाले की, ‘ती या चित्रपटात इमरानच्या प्रेयसीची भूमिका साकारत असल्यामुळे क्रिस्टलवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.’

रियाला आणखी त्रास द्यायचा नाही!

आनंदला पुन्हा रियाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘चुकीच्या कारणास्तव रियाला चर्चेत आणावे, असे मला वाटत नव्हते. तिला आधीच खूप त्रास सहन करावा लागला आहे. माझ्या फिल्म आणि नफ्यासाठी मी तिला त्रास देऊ शकत नाही. मी याबाबत रियाशीही बोललो आहे.’

(Rhea Chakraborty share post about love is she missing sushant on the occasion of holi)

हेही वाचा :

Holi 2021 | मराठी कलाकारांवरही चढलाय होळीचा रंग, ‘या’ जोड्या साजरी करणार लग्नानंतरची पहिली होळी!

Video | जेव्हा सुशांतने होळीच्या दिवशी जॅकलीन-अंकितासोबत लगावले होते ठुमके, चाहत्यांनी शेअर केल्या आठवणी!

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.