Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rhea Chakraborty | नवीन वर्षात रिया चक्रवर्ती कमबॅक करण्याच्या तयारीत

रिया जवळपास एक महिन्यापर्यंत तुरुंगात होती आणि आता ती जामिनावर बाहेर आहे. पण, नव्या वर्षात रिया देखील नवी सुरुवात करण्याच्या तयारीत आहे.

Rhea Chakraborty | नवीन वर्षात रिया चक्रवर्ती कमबॅक करण्याच्या तयारीत
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 1:13 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात (Rhea Chakraborty To Make Comeback In Industry) आली होती. रिया जवळपास एक महिन्यापर्यंत तुरुंगात होती आणि आता ती जामिनावर बाहेर आहे. पण, नव्या वर्षात रिया देखील नवी सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. रिया 2021 मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये वापसी करणार आहे (Rhea Chakraborty To Make Comeback In Industry).

“रियाचा कमबॅक तिला या शॉकमधून बाहेर येण्यास मदत करेल. रिया 2021 मध्ये कामावर वापसी करणार आहे”, अशी माहिती रियाचा मित्र रुमी जाफरीने दिली.

रुमी जाफरीने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती दिली. “हे वर्ष रियासाठी अत्यंत धक्कादायक ठरलं. हे वर्ष तर सर्वांसाठीच वाईट होतं. मात्र, तिच्यासाठी हा धक्का खूप मोठा होता. एक मिडल क्लास कुटुंबाची मुलगी एक महिन्यापर्यंत तुरुंगात होती. त्यामुळे ती खूप खचली आहे.”

रुमी जाफरीने रियाला आश्वासन दिलंय की संपूर्ण इंडस्ट्री मोठ्या मनाने तिचं स्वागत करेल. त्यांनी सांगितलं की, “ते नुकतेच रियाला भेटले होते. ती यावेळी अत्यंत शांत होती. ती काहीही बोलली नाही. ज्या दुखातून ती गेली आहे, त्यानंतर तिच्यावर कुठलाही आरोप करणे चुकीचं आहे. आता सर्व सांत होऊ द्या. मला माहिती आहे की तिच्याजवळ आता बोलायला काहीही नाही”, असं ते म्हणाले.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू

अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जूनला त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरी मृत आढळून आला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी तिन्ही संस्था सीबीआय, ईडी आणि एनसीबी करत आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज केसमध्ये रियाचं नाव पुढे आलं होतं. त्यानंतर तिला अटक करण्यात आलं होतं (Rhea Chakraborty To Make Comeback In Industry).

त्यानंतर ती जवळपास एक महिन्यापर्यंत तुरुंगात होती. त्यानंतर मुंबई उच्चा न्यायालयाने तिची जामीन याचिका मंजूर केली. रियासोबत तिचा भाऊ शौविकलाही अटक करण्यात आली. शौविकला तीन महिन्यांनंतर उच्च न्यायालयाने जामीन दिली.

Rhea Chakraborty To Make Comeback In Industry

संबंधित बातम्या :

Rhea Chakraborty | रिया चक्रवर्ती ‘ड्रग्ज सिंडिकेट’मध्ये नाही; कोर्टाकडून दिलासा!

Rhea Chakraborty bail | अखेर रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर, शौविक चक्रवर्तीला दिलासा नाहीच!

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.