Riteish Deshmukh | ‘सत्यापेक्षा ताकदवान कोणीच नाही’, रितेश देशमुख रियाच्या समर्थनार्थ मैदानात!
‘रिया चक्रवर्ती तुला लढण्यासाठी खूप ताकद मिळो. सत्यापेक्षा ताकदवान कोणीच नाही’, असे म्हणत त्याने रियाला पाठिंबा दिला.
मुंबई : ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्याने तुरुंगातून बाहेर पडलेल्या रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) शेजारी राहणाऱ्या डिंपल थवानी या महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. खोटी माहिती देऊन, सीबीआयच्या तपासाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न डिंपलने केला, असा आरोप रियाने केला आहे. रिया चक्रवर्तीने सीबीआयकडे आपले तक्रार पत्र सोपवले आहे. तसेच, डिंपलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तिच्या या मागणीला पाठिंबा देत, अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) रियाच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. (Riteish Deshmukh Shows Support To Rhea Chakraborty)
आत्महत्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 जूनला सुशांत सिंह राजपूत रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) तिच्या घरी सोडण्यासाठी आला होता. आपण त्या दोघांना पाहिले होते, असे रियाच्या शेजारी राहणाऱ्या डिंपल थवानी हिने सांगितले होते. नुकताच सीबीआयकडून तिचा जबाब नोंदवण्यात आला. तर, डिंपलनेच ही खोटी माहिती माध्यमांना दिली असून, तिच्यावर कारवाई करण्यात यावी, असे तक्रारपत्र रिया चक्रवर्तीने सीबीआयला दिले आहे.
सत्यापेक्षा ताकदवान कोणीच नाही
रिया चक्रवर्तीला पाठिंबा दर्शवत अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) ट्विट केले आहे. ‘रिया चक्रवर्ती तुला लढण्यासाठी खूप ताकद मिळो. सत्यापेक्षा ताकदवान कोणीच नाही’, अशा आशयाचे ट्विट रितेश देशमुखने केले आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येशी संबधित ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर एनसीबीकडून रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. मात्र, जामीन मिळाल्याने तुरुंगाबाहेर आलेल्या रियाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. (Riteish Deshmukh Shows Support To Rhea Chakraborty)
More power to you @Tweet2Rhea – Nothing is more powerful than TRUTH. pic.twitter.com/rj8nqYY06E
— Riteish Deshmukh (@Riteishd) October 12, 2020
रियाच्या वकिलांकडून डिंपलवर आरोप
रिया चक्रवर्तीचे (Rhea Chakraborty) वकील सतिश मानेशिंदे यांनी देखील डिंपलवर प्रसिद्धीसाठी खोटे बोलण्याचा आरोप लावला आहे. 2 मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी डिंपल थवानीने खोटे वृत्त पसरवले, असे त्यांनी म्हटले आहे. ‘मी सुशांतची चाहती असून, मागच्या जन्मीपासूनचे आमचे नाते आहे. आम्ही सोलमेट होतो’, असा दावा डिंपल थवानीने केला होता.
सीबीआय जबाबात डिंपलचा यु-टर्न
डिंपल थवानीने आधी बरेच दावे केले. परंतु, सीबीआयकडे जबाब नोंदवताना तिने आपण दोघांना पाहिले नाही, असे म्हटल्याचे कळते आहे. ‘मी सुशांत आणि रियाला पाहिले नव्हते, तर दुसऱ्या कोणीतरी त्या दोघांना एकत्र पहिले होते’, असे रियाच्या शेजारी राहणाऱ्या डिंपल थवानीने सीबीआयला सांगितले. तर, त्या व्यक्तीने दोघांना नेमके कुठे पाहिले होते, हे देखील आठवत नसल्याचे तिने म्हटले. या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे सीबीआयने तिला चांगलेच फटकारल्याचे कळते आहे. ज्याचे पुरावे नाहीत, अशी खोटी माहिती देऊ नको, असा समज तिला देण्यात आला आहे. (Riteish Deshmukh Shows Support To Rhea Chakraborty)
डिंपल विरोधात रियाने दाखल केली तक्रार
एनसीबीने अटका केल्याने रियाला तब्बल 28 दिवस तुरुंगात काढावे लागेल. तीन वेळा जामीन अर्ज फेटाळल्या नंतर न्यायालयाने चौथ्यावेळी तिचा जामीन अर्ज अखेर मंजूर केला. सध्या रिया (Rhea Chakraborty) तिच्या घरी परतली आहे. मात्र, यादरम्यान तिने तिच्याविरोधात खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करायला सुरुवात केली आहे. यात पहिले नाव डिंपल थवानीचे आहे. रियाने सीबीआयला तक्रार पत्र देत, तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संबंधित बातम्या :
रियासंबंधित खोटी माहिती देणाऱ्या शेजारणीला सीबीआयने फटकारले, डिंपल थवानी विरोधात तक्रार दाखल
Rhea Chakraborty bail | तब्बल 28 दिवसानंतर रियाची सुटका, भायखळा तुरुंगाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त!
Rhea Chakraborty | रिया चक्रवर्ती ‘ड्रग्ज सिंडिकेट’मध्ये नाही; कोर्टाकडून दिलासा!
(Riteish Deshmukh Shows Support To Rhea Chakraborty)