Riteish Genelia Organ Donation | रितेश-जेनेलिया यांचा अवयवदानाचा निर्णय

जीवनदान करण्याची प्रतिज्ञा करा, अवयवदान करण्याची शपथ घ्या" असं आवाहन रितेश-जेनेलिया यांनी इंस्टाग्रामवरुन केलं आहे. (Riteish Deshmukh Wife Genelia Pledges to Donate Organs)

Riteish Genelia Organ Donation | रितेश-जेनेलिया यांचा अवयवदानाचा निर्णय
Follow us
| Updated on: Jul 02, 2020 | 8:35 AM

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख यांनी ‘डॉक्टर्स दिना’च्या निमित्ताने एक स्तुत्य निर्णय जाहीर केला. रितेश-जेनेलिया यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत रितेश-जेनेलिया यांनी अवयवदानाची माहिती दिली. (Riteish Deshmukh Wife Genelia Pledges to Donate Organs)

लाडक्या सेलिब्रिटी कपलने जनजागृती करणारा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांकडून दोघांचं कौतुक केलं जात आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आले आहेत.

“रितेश आणि मी फार आधीपासून अवयवदानाचा विचार करत होतो. पण ते शक्य झालं नव्हतं. डॉक्टर दिनाचं औचित्य साधत आम्ही अवयवदान करण्याची शपथ घेत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल डॉ. नोझर शेरिअर आणि FOGSI यांचे आभार. तुम्हाला एखाद्यास सर्वोत्तम भेटवस्तू द्यायची असेल, तर ‘आयुष्य’ हेच ते गिफ्ट आहे. या उपक्रमात तुम्हीही सहभागी व्हा आणि जीवनदान करण्याची प्रतिज्ञा करा, अवयवदान करण्याची शपथ घ्या” असं आवाहन रितेश-जेनेलिया यांनी इंस्टाग्रामवरुन केलं आहे.

संबंधित बातमी :

पत्नीला सरप्राईज करण्यासाठी नवी हेअरस्टाईल, रितेश देशमुख ट्रोल

(Riteish Deshmukh Wife Genelia Pledges to Donate Organs)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.