स्वत:ला अविवाहित म्हणत होता रितेश देशमुख, तितक्यात मागून आली जेनिलिया अन्..

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे दोघे फक्त बॉलिवूडमधीलच नव्हे तर सोशल मीडियावरचंही पॉवर कपल आहे. मोठ्या पडद्यावर धमाल करणारे रितेश-जेनेलिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. बऱ्याचवेळा ते त्यांचे मजेशीर रीलस बनवून शेअर करत असतात आणि ते पाहून चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं.

स्वत:ला अविवाहित म्हणत होता रितेश देशमुख, तितक्यात मागून आली जेनिलिया अन्..
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 12:39 PM

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे दोघे फक्त बॉलिवूडमधीलच नव्हे तर सोशल मीडियावरचंही पॉवर कपल आहे. मोठ्या पडद्यावर धमाल करणारे रितेश-जेनेलिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. बऱ्याचवेळा ते त्यांचे मजेशीर रीलस बनवून शेअर करत असतात आणि ते पाहून चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. याच जोडीने नुकतंच एक नव, मजेशीर नव रील बनवलं आहे. जे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालं असून त्यावर फक्त चाहत्यांच्याच नव्हे तर सेलिब्रिटींच्याही कमेंट्स आल्या आहेत.

रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी एक लेटेस्ट रील बनवून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. ‘जाने तू या जाने ना’ फेन या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचं लेटेस्ट रील पोस्ट केला आहे. हे रील रितेशपासून सुरू होतं. यामध्ये तो 1997 सालच्या रोमँटिक मूव्ही, मिस्टर अँड मिसेस खिलाडी मधील जुही चावलाच्या अकेला है मिस्टर खिलाडी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

मात्र तेवढ्यात त्याच्या मागून जेनेलियाची एंट्री होती. स्मार्ट पत्नी असलेली जेनेलिया येते आणि रितेशचं गाणं बदलून नवं गाणं लावते. बिवी नंबर 1 गाणं सुरू करते आणि तिच्या पतीला, अर्थात रितेशला त्या गाण्यावर रील बनवण्यास सांगते. त्यावर रितेशचा चेहरा बघण्यालायक होतो. ‘बिवी नंबर 1 विथ नॉर्मल नवरा रितेश’ अशी कॅप्शन लिहीत जेनेलियाने हे रील शेअर केलंय.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

पोस्टवर चाहत्यांच्या, सेलिब्रिटींच्या कमेंट्सचा पाऊस

त्यांचं हे नव रील चाहत्यांना खूप आवडलंय आणि सेलिब्रिटीही त्यावर खूप खुश झाले आहेत. या पोस्टवर ‘ मिस्टर अँड मिसेस खिलाडी ‘ चित्रपटातील अभिनेत्री, जुही चावलानेही रिॲक्शन दिली आहे. तिने कमेंट सेक्शनमध्ये एक हसणारी ईमोजी टाकली आहे. त्यावर जेनेलियाने Awww.. असं लिहीत रिप्लाय दिला. जुही चावला हिच्या व्यतिरिक्त नील नितीन मुकेश, मुश्ताक शेख, हंसिका मोटवानी आणि जय भानुशाली यांसारख्या कलाकारांनी या पोस्टवर कमेंट करत रिॲक्शन दिली.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....