Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॉडफादर सातव्यांदा बनला फादर, Robert De Niro 79 व्या वर्षी बनले पिता

हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डी नीरो पुन्हा एकदा बाबा बनले आहेत. वयाच्या 79 व्या वर्षी अभिनेत्याने ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांशी शेअर केली. हे त्याचे 7 वे अपत्य असून अभिनेत्याचे दोनदा लग्न झाले आहे.

गॉडफादर सातव्यांदा बनला फादर, Robert De Niro 79 व्या वर्षी बनले पिता
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 12:45 PM

Robert De Niro Become Father : हॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात ताकदवान अभिनेत्याची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यात रॉबर्ट डी नीरोचे (Robert De Niro) नाव अग्रक्रमाने येते. गॉडफादर आणि टॅक्सी ड्रायव्हर या चित्रपटातील त्यांचा अभिनय कोण विसरू शकेल? चित्रपटांव्यतिरिक्त ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. हॉलिवूड सुपरस्टारने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. रॉबर्ट डी निरो हे पुन्हा एकदा पिता (father) बनले आहेत. वयाच्या 79 व्या वर्षी ते वडील झाले आहेत. त्यांची गर्लफ्रेंड टिफनी चेन हिने बाळाला जन्म दिला असून हे त्यांचे सातवे अपत्य आहे.

तसं पहायला गेलं तर 79 वर्षे हे आजोबा होण्याचे वय आहे. पण हॉलिवूड स्टार या वयात पुन्हा बाबा झाले आहेत. आणि त्यांची सध्याची गर्लफ्रेंड टिफनी आई झाली आहे. रॉबर्ट यांनी ET Cananda ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. त्यांनी मुलाखतीत मुलांसोबतच्या बाँडिंगबद्दल सांगितले. ते आपल्या मुलांशी कसे वागतात आणि ते एक चांगले, परिपूर्ण बाबा आहेत की नाही हे त्यांनी सांगितले. वयाच्या 79 व्या वर्षी वडील होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांची मोठी मुलगी 51 वर्षांची आहे.

रॉबर्ट यांनी सांगितले ते काही कूल डॅड नाहीत. कधी-कधी ते मुलांशी वादही घालतात पण त्याबद्दल ते फार काही करू शकत नाहीत. तथापि, ते असेही म्हणाले की मुलांवर प्रेम करण्यावर माझा विश्वास आहे आणि त्यांच्यासमोर खूप कठोर न वागण्याचा मी प्रयत्न करतो. जर मुलांनी काही चुकीचे केले तर तुम्ही त्यांना शिकवण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, परंतु प्रत्येक वेळी तुम्ही हे करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीत कोणाचीही अडवणूक करता येत नाही.

अभिनेत्याची फॅमिली ट्री

रॉबर्ट यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचे तर, त्यांना त्याची पहिली पत्नी डिहेन अॅबॉटपासून ड्रेना आणि राफेल नावाची दोन मुले आहेत. ड्रेना आता 51 वर्षांची आहे आणि राफेल 46 वर्षांची आहे. त्याच वेळी, त्याला त्याची दुसरी पत्नी ग्रेस हायटॉवरपासून दोन मुले देखील आहेत. मुलाचे नाव इलियट आहे जो 25 वर्षांचा आहे आणि मुलगी हेलन आता 11 वर्षांची आहे. याशिवाय, अभिनेत्याला त्याची माजी मैत्रीण टोकी स्मिथपासून अॅरॉन आणि ज्युलियन नावाची दोन जुळी मुले आहेत. तर त्यांची सध्याची मैत्रीण टिफनी हिने नुकताच बाळाला जन्म दिला आहे.

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.