वय पाहून प्रेम होत नसतं.. ! फक्त धर्मेंद्र-शबाना आझमी नव्हे, साठी पार केलेल्या या सेलिब्रिटींनीही मोठ्या पडद्यावर केला रोमान्स…

रॉकी और रानी पासून ते लाइफ इन ए मेट्रो, निशब्द सारख्या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की प्रेम आणि रोमान्स करण्याचं काही वय नसतं. आजी-आजोबांच्या वयातील कलाकरांनी किस आणि इंटिमेट सीन केलेले पाहून चाहते हैराण झालेत.

वय पाहून प्रेम होत नसतं.. ! फक्त धर्मेंद्र-शबाना आझमी नव्हे, साठी पार केलेल्या या सेलिब्रिटींनीही मोठ्या पडद्यावर केला रोमान्स...
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 1:33 PM

मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्या प्रेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आजी-आजोबांची भूमिका निभावणाऱ्या या कलाकारांचा या चित्रपटात एक किसींग सीनही आहे, ज्यामुळेही या दोघांबद्दल सध्या अनेक चर्चा आहेत. साधारणत: आपण चित्रपटांत यंग जनरेशनचा रोमान्स (romance) पाहतो, पण या चित्रपटाने हा ट्रेंड तोडत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की प्रेमासाठी वयाची काही मर्यादा नसते.

दरम्यान यापूर्वीही बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी मोठ्या पडद्यावर रोमान्स केला आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यापासूने ते राजेश खन्ना यांचा समावेश आहे. ते चित्रपट आणि ते कलाकार कोणते ते जाणून घेऊया.

रॉकी और रानी की प्रेम कहानी

प्रेम आणि रोमान्स करण्याचे कोणतेही (ठराविक) वय नसते हे 87 वर्षांचे धर्मेंद्र आणि 72 वर्षांच्या शबाना आझमी यांच्या किसींग सीनने सिद्ध केले आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या लिपलॉक सीनची खूप चर्चा होत आहे. या चित्रपटात रॉकी आणि राणी यांच्यासोबतच धर्मेंद्र (आजोबा) आणि शबाना आझमी (दादी) यांची अपूर्ण प्रेमकहाणीदेखील दाखवण्यात आली आहे. शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्या सांगण्यानुसार, त्यांना हा सीन करताना जराही वेगळं किंवा चुकीचं वाटलं नाही, हा सीन चित्रपटाची गरज होता.

लाइफ इन अ मेट्रो

हे काही पहिल्यांदाच नाही, धर्मेंद्र यांनी यापूर्वीही ‘लाइफ इन अ मेट्रो’ चित्रपटातही किसींग सीन दिला होता. त्या चित्रपटात धर्मेंद्र आणि नफीसा अली यांच्यादरम्यान प्रेम आणि रोमान्स दाखवण्यात आला होता. दोघांनी एक किसींग सीनही केला होता, जो लोकांना आवडला होता, त्याचे कौतुकही झाले होते.

नि:शब्द

बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि जिया खान यांच्या ‘नि:शब्द’ चित्रपटाने धूमाकूळ घातला होता. या चित्रपटात जिया खान ही 18 वर्षीय तरूणी तिच्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेली दाखवण्यात आले आहे. अमिताभ बच्चन आणि जिया खान यांच्या लिपलॉक सीननेही सर्वांना नि:शब्द केले होते. तसेच या चित्रपटात अनेक बोल्ड सीन होते, जे पाहून चाहते हैराण झाले होते.

चीनी कम

या चित्रपटात 64 वर्षांचे अमिताभ बच्चन आणि 34 वर्षांची तब्बू यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती. दोघांचही एकमेकांवर खूप प्रेम असतं. ‘चीनी कम’ या चित्रपटात तब्बू आणि अमिताभ बच्चन यांचा रोमान्स पाहून आपण हेच म्हणू शकतो की, प्रेम हे कोणत्याही वयात आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तीशी होऊ शकते. या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि तब्बू यांची केमिस्ट्री चाहत्यांना बरीच आवडली होती.

दिल चाहता है

‘दिल चाहता है’ चित्रपटात अक्षय खन्ना हा त्याच्यापेक्षा अनेक वर्षांनी मोठ्या असलेल्या डिंपल कपाडिया हिच्या प्रेमात पडलेला दाखवला आहे. त्यांच्यात जरी रोमान्स वगैरे दाखवला नसला तरी चित्रपटातील हा प्रसंग संपूर्ण कथेला वेगळी कलाटणी देतो. अक्षय खन्नाच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. त्याचा सिद्धार्थ सर्वांना भावला होता.

वफा: अ डेडली लव स्टोरी

2008 मध्ये आलेल्या राजेश खन्ना यांच्या या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. या चित्रपटाद्वारे राजेश खन्ना यांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण चित्रपटावर बरीच टीका झाली. या चित्रपटात राजेश खन्ना आणि त्यांच्याहून 36 वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री लैला खान या दोघांदरम्यान अनेक इंटिमेट सीन होते, जे चाहत्यांना आणि प्रेक्षकांनाही फारसे आवडले नाहीत. या चित्रपटासंदर्भात बराच वाद झाला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.