RRR | राजामौलींच्या ‘आरआरआर’मध्ये अशी दिसणार आलियाने साकारलेली ‘सीता’, पाहा तिचा खास लूक…

हिरवी साडी, लाल ब्लाऊज, केसांमध्ये अबोलीचा गजरा आणि चेहऱ्यावरील शांत भाव सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या लूकने चाहते नक्कीच पुन्हा एकदा आलियाच्या प्रेमात पडतील, हे नक्कीच!

RRR | राजामौलींच्या ‘आरआरआर’मध्ये अशी दिसणार आलियाने साकारलेली ‘सीता’, पाहा तिचा खास लूक...
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 1:05 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) आज (15 मार्च) वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आलियाने तिच्या चाहत्यांसह एक मोठे सरप्राईज शेअर केले आहे. या खास दिवशी आलियाने तिच्या बहुचर्चित ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘सीता’चा लूक सोशल मीडियावर शेअर केला आजे. काही दिवसांपूर्वीच अशी घोषणा करण्यात आली होती की, 15 मार्च रोजी म्हणजेच आलिया भट्ट हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘आरआरआर’ मध्ये ती साकारात असलेली सीतेची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आणेल (RRR movie alia bhatt sita character look reveal).

अभिनेत्री आलिया भट्ट एसएस राजामौलीच्या चित्रपटाद्वारे तेलुगूमध्ये पदार्पण करत आहे, ज्याबद्दल ती आणि तिचे चाहते खूपच उत्साही आहेत. या अगोदर तिच्या वाढदिवसाच्या आधी, म्हणजेच 14 मार्चच्या रात्री आलियाने तिच्या इंस्टाग्रामद्वारे तिच्या ‘आरआरआर’च्या तिच्या लूकची एक झलक दाखवली आहे. यात आलिया काळ्या रंगाची छटा असलेल्या ठिकाणी बसली आहे. ही जागा एका मंदिरासारखी दिसते, कारण आलिया एका मूर्तीसमोर बसली आहे, जी माता सीतेची मूर्ती आहे. हा फोटो शेअर करताना आलिया म्हणाली की, ‘तिचा संपूर्ण लूक उद्या म्हणजेच सोमवारी प्रदर्शित होईल’, असे म्हटले होते.

पाहा आलियाचा लूक

(RRR movie alia bhatt sita character look reveal)

हिरवी साडी, लाल ब्लाऊज, केसांमध्ये अबोलीचा गजरा आणि चेहऱ्यावरील शांत भाव सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या लूकने चाहते नक्कीच पुन्हा एकदा आलियाच्या प्रेमात पडतील, हे नक्कीच!

एस. एस. राजामौलीच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने मोठा पडदा चांगलाच गाजवला होता. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. यानंतर आता या चित्रपटाच्या माध्यमातून तेलगू चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार्स अर्थात ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेता राम चरण या पीरियड ड्रामामध्ये प्रथमच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनंतर हा चित्रपट चांगला चर्चेत आला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत (RRR movie alia bhatt sita character look reveal).

चित्रपटाचे हक्क विक्रीला

‘आरआरआर’ हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर केवळ 5 भाषांमध्ये थिएट्रिकल राइट्ससाठी आतापर्यंत 348 कोटीहून अधिकच्या ऑफर आल्या आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेनंतर चाहते या चित्रपटाविषयी खूप उत्सुक झाले आहेत. आरआरआरला तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राइट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे

चांगला गल्ला जमवणार!

खास गोष्ट म्हणजे ‘बाहुबली 2’च्या रिलीजपूर्वी या आकड्याला मागे टाकले आहे, ज्याने दक्षिण-भाषिक राज्यांमधून सुमारे 215 कोटी रुपये कमावले होते. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की रिलीज झाल्यानंतर ‘आरआरआर’ चांगलाच गल्ला जमवणार आहे. ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, समुथिरकानी आणि अ‍ॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. हा सर्वात मोठा हिट भारतीय चित्रपट ठरणार आहे.

(RRR movie alia bhatt sita character look reveal)

हेही वाचा :

Birthaday Special | करिअरच्या उच्च शिखरावर असताना का झाला इंडस्ट्रीमधून गायब?, वाचा हनी सिंगबद्दल…  

Video : रणबीर कपूर आजारी असतानाही आलियाचा डान्सिंग मूड, लग्नात ‘गेंदा फूल’वर थिरकली !

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.